घरमहाराष्ट्रबैल गेले, ट्रॅक्टर आले, शेतकर्‍यांचा दोस्त बदलला!

बैल गेले, ट्रॅक्टर आले, शेतकर्‍यांचा दोस्त बदलला!

Subscribe

खालापूर तालुक्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून वेळेवर पाऊस आल्याने शेतकरी आनंदीत झाला आहे. शेतीच्या नांगरणीला सुरूवात झाली आहे. शेतकर्‍यांचा पारंपरिक मित्र असलेल्या बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करताना दिसत आहेत.

या परिसरातील जवळपास सर्वच जमिनी धनिकांच्या आहेत. अनेक शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी विकल्या आहेत, परंतु जे हाडाचे शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या जमिनीत मोती उगविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याला आधुनिक यंत्रांची जोड देण्यात येत आहे. अनेक शेतकर्‍यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचत नाहीत. नांगरणीसाठी बैल नाहीत. कारण बैल पाळणे बर्‍याचजणांना विविध कारणांमुळे परवडत नाही. मनुष्यबळ असूनदेखील कुणीही मेहनतीने काम करण्याची तयारी दाखवत नाही.

- Advertisement -

कमी श्रमात काम करून पैसे मिळविण्यासाठी प्रत्येकजण धावत असल्याने पारंपरिक शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पण काही शेतकरी नेटाने शेती करत आहेत. बैल जुंपून शेती नांगरण्यासाठी अनेक दिवस जातात. त्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागते. ट्रॅक्टरने काही तासात नांगरणी होते. त्यामुळे बैल पाळण्याकडे लोकांचा कल कमी झाला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबरोबर पूर्वीसारखी एकत्रित शेती केल्यास मजूर, पैसा याची बचत होईल. पर्यायाने सर्व शेतकरीही एकत्र राहून गावात शांतता प्रस्थापित होईल, असे मत प्रगत शेतकरी व भिलवले गावचे पोलीस पाटील अनंत ठोंबरे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -