घरमुंबईबॉम्ब सदृश्य वस्तूने ग्रामस्थांमध्ये घबराट

बॉम्ब सदृश्य वस्तूने ग्रामस्थांमध्ये घबराट

Subscribe

तपासणी अंती बॅटरी असल्याचे निष्पन्न

भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील खालींग बु या गावात एका घराच्या पायरीवर पहाटे बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने गावात एकाच घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच त्वरित बॉम्ब शोधक पथक आले. त्यांनी केलेल्या तपासणीत ती वस्तू बॅटरी सोर्स असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामस्थांसह पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील खालींग बु या गावातील शांताराम पीतांबरे यांना त्यांच्या घराच्या पायरीवर पहाटे चार वाजता एक बॅटरी संच आढळून आला . ती वस्तू बॉम्ब सदृश्य दिसत असल्याने त्यांनी तात्काळ गावातील पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव यांना माहिती दिली. त्यांनी त्वरित पडघा पोलिसांना कळविले. पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे हे पोलीस फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. त्यांनी या संशयास्पद वस्तू बाबत खात्री करण्यासाठी ठाणे बॉम्ब शोधक पथकास बोलावले. बॉम्ब शोधक पथकाच्या जवानांनी या वस्तूची पाहणी केली. तेव्हा ती बॅटरी सोर्स असल्याचे निष्पन्न झाले . या पूर्वी या गावात कुरियर द्वारा बाटली बॉम्ब पाठविला होता. त्यामध्ये एक महिला जखमी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -