घरमहाराष्ट्रपोलीस असल्याची बतावणी करत लुबाडणाऱ्या दोन संशयितांना अटक

पोलीस असल्याची बतावणी करत लुबाडणाऱ्या दोन संशयितांना अटक

Subscribe

पोलीस असल्याची बतावणी करून ट्रक चालकांकडून पैसे लुबाडणाऱ्या दोघा संशयितांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.

पोलीस असल्याची बतावणी करून ट्रक चालकांकडून पैसे लुबाडणाऱ्या दोघा संशयितांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी संबंधित संशयितांना पंचवटी पोलीसांच्या ताब्यात दिले असून त्यांचे विरूद्ध पोलीस असल्याची बतावणी करून पैसे लुबाडलेले म्हणून म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई दिनेश गुंबाडे आणि सी. आर. चव्हाण हे दोघेही आपले कर्तव्य बजावत होते. मंगळवार, २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान एका ट्रक चालकाने तारवाला नगर येथील लामखेडे मळा चौफुलीवर दोन संशयित पोलीस असल्याची बतावणी करून पैसे मागत असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलीस शिपाई गुंबाडे आणि चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अक्षय सदाशिव दोंदे (वय २१, रा. बी -७, शिव नगर, तलाठी कॉलनी) तसेच भूषण अरुण जाधव (रा. प्लॉट न. ७५, शिव नगर तलाठी कॉलनी) संशयित हे काळ्या रंगाची पल्सर एमएच १५ सीए ३३७२ रस्त्याच्या कडेला लावून ट्रक चालकांकडून पैसे मागत असताना पोलीस शिपाई गुंबाडे व चव्हाण यांनी पकडले तसेच पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात दिले. या दोनही संशयितांविरूद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात पोलीस असल्याची बतावणी करून पैसे मागितल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

म्हसरूळ पोलिसांनी या दोनही संशयितांना पंचवटी पोलीसांच्या ताब्यात दिल्यानंतर चौकशीअंती यांनी म्हसरूळ पोलीस हद्दीसह शहरात सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिल्याचे वृत्त पोलीसांनी सांगितले आहे. यामुळे या संशयितांकडून शहरातील विविध ठिकाणी झालेल्या सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तारवाला नगर येथील लामखेडे मळा चौफुलीवर दोन संशयित पोलीस असल्याची बतावणी करून पैसे मागत असल्याचे समजताच पोलीस शिपाई दिनेश गुंबाडे व पंकज चव्हाण यांनी घटनास्थळी पोहोचले. तसेच संशयितांना ताब्यात घेत पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. तत्परतेने कर्तव्य पार पाडणाऱ्या दोन्ही पोलीस शिपाई गुंबाडे व चव्हाण यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते लवकरच पोलीस रिवार्ड देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा –

ठरलं एकदाचं; महाविकासआघाडीत सत्तेचे वाटप असे होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -