Eco friendly bappa Competition
घर क्राइम Video : 'मॅडम, बहुत क्युट हो तुम', वांद्रे स्थानकात महिला पोलिसाचीच काढली छेड

Video : ‘मॅडम, बहुत क्युट हो तुम’, वांद्रे स्थानकात महिला पोलिसाचीच काढली छेड

Subscribe

Mumbai Local News | याप्रकरणी संबंधित महिला पोलिसाने वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारावर रील बनवणाऱ्या या तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Mumbai Local News | मुंबई – मुंबई उपनगरीय लोकलमधून महिला प्रवाशांच्या छेडछाडीचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. महिला प्रवाशांना त्रास होत असतानाच आता महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात करणाऱ्या आलेल्या महिला पोलीसही रेल्वे स्थानकात सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओतील दृष्यानुसार वांद्रे रेल्वे स्थानकात (Bandra Railway Station) एका महिला पोलिसाची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकात काही तरुणांनी महिला पोलिसाची छेड काढली. लोकलच्या दरवाज्यावर उभे राहत स्थानकात उभ्या असलेल्या महिला पोलिसाला ‘पोलीस मॅडम बहोत क्युट हो तुम’ असं म्हणत छेड काढली. या व्हिडीओवर मस्तान कंपनी अशा नावाचा उल्लेख आहे. लोकलमधून मुलं छेड काढत असताना लोकलमधील इतर प्रवाशांनी त्यांना साधं हटकण्याचाही प्रयत्न केला नाही. या व्हिडीओमध्ये दोन मुलं दिसत असून ते एका महिला पोलीस कर्मचाऱ्याबाबत अश्लिल भाषेत बोलत असल्याचं स्पष्ट दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील एका फ्लॅटमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह, मुलीवर संशय

दरम्यान याप्रकरणी संबंधित महिला पोलिसाने वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारावर रील बनवणाऱ्या या तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisement -

दरम्यान हा व्हिडीओ जीवनधारा संघ या ट्वीटर खात्यावरून शेअर करत मुंबई पोलिसांच्याही ही घटना लक्षात आणून दिली आहे. त्यावर नेटीझन्सने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहेत. महिला डब्यातून अनेक पुरुष प्रवास करत असून त्याकडे सुरक्षारक्षकांचं दुर्लक्ष होत असल्याने अनेक महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisment -