घरमहाराष्ट्रपोलिसांनी आव्हाड आणि रोहित पवारांची कसून चौकशी करावी, Chitra Wagh यांची मागणी

पोलिसांनी आव्हाड आणि रोहित पवारांची कसून चौकशी करावी, Chitra Wagh यांची मागणी

Subscribe

मुंबई : नागपाडा मोटार परिवहन विभागाच्या आठ महिला शिपायांवर त्यांच्याच वरिष्ठांनी बलात्कार केल्याचे वृत्त पसरले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, याप्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीसातील संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि राज्य महिला आयोगानेही जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. पण नंतर हे पत्र बनावट असल्याचे उघड झाले. यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या पोलीस चौकशीची मागणी केली आहे.

हेही वाचा – Kiran Mane यांनी Prabodhankar Thackeray यांच्यासाठी केली खास पोस्ट, म्हणाले – अशी आपली माणसं…

- Advertisement -

नागपाडा मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या आठ महिला शिपायांवर त्यांच्याच वरिष्ठांनी लैंगिक अत्याचार केल्याचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात या महिला पोलिसांनी पोलीस उपआयुक्तांसह दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस हवालदारांवर गंभीर आरोप केले होते. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली असली तरी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता या ‘निर्भयां’ना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीसातील संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही जातीने लक्ष घालण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

- Advertisement -

तर, हा प्रकार राज्याची प्रतिमा खराब करणारा आहे. हा विषय संवेदनशील असल्याने, हे पत्र खरे की खोटे, याबाबत गृहमंत्र्यांनी खुलासा करावा आणि पत्र खरे असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. मात्र, हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले. या आठही महिलांची जबानी नोंदविली असून त्यांनी अशा प्रकारचे कुठलेही पत्र पाठविले नसल्याचे म्हटले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – Lakshadweep : मोदी हे उत्तम अभिनेते आणि त्यांचा ‘फोटोसेन्स’ चांगला, ठाकरे गटाची टोलेबाजी

यावर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांना लक्ष्य केले आहे. प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचा जावईशोध लावणाऱ्या रावणी प्रवृत्तीच्या जितेंद्र आव्हाड यांनी आता महिलांच्याही अब्रूच्या चिंधड्या उडवल्या आहेत. त्यांचीच री ओढत आमदार रोहित पवारही या चिखलफेकीत सामील झाले. आपल्या थिल्लर स्वभावाला अनुसरून आव्हाड यांनी महिला कर्मचाऱ्यांसंदर्भात बेबंद गंभीर आरोप केल्यामुळे सगळ्या पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची झाले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

राजकारणातले हिशोब सेटल करण्यासाठी आव्हाड यांनी नीचपणाची आणखी एक पायरी गाठली आहे. जो प्रकार घडलाच नाही, त्याची बोंबाबोंब करून समस्त पोलीस दलाची बदनामी केली. या अर्जातील माहिती पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे पोलिसांना आढळले आहे. पोलीस याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करतीलच, पण आव्हाड आणि रोहित पवार यांनी एक काल्पनिक प्रकरण रंगवत त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्याकरिता करणे, हे अधिक गंभीर असल्याचे सांगत, मुंबई पोलिसांनी त्यांचीही कसून चौकशी करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

हेही वाचा – Anurag Thakur : मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू; अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -