Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पोलिसांच्या सुट्टीबाबत मोठा निर्णय ! पोलिस महासंचालकांची पत्राद्वारे सूचना

पोलिसांच्या सुट्टीबाबत मोठा निर्णय ! पोलिस महासंचालकांची पत्राद्वारे सूचना

Related Story

- Advertisement -

पोलिस संचालक संजय पांडे यांनी पोलिसांना दिलासा देणारा असा एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिसांना ऑन ड्युटी दरम्यानचा भार थोडासा हलका होणार आहे. पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने काही निरीक्षणे नोंदवूनच पोलिस महासंचालकांनी पोलिस दलाला सूचना दिल्या आहेत. सर्व पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई वगळून), सर्व पोलिस अधिक्षक आणि सर्व समादेश, राज्य राखील पोलिस बलट गट यासाठीचे हे आदेश आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साप्ताहीक सुट्टी पूर्व दिवसाच्या कामकाजाचे नियोजन करण्यासाठीचे हे आदेश आहेत.

पोलिस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, असे निदर्शनास आले आहे की, पोलिस अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्रीची गस्त किंवा २४ तास कर्तव्य अशा प्रकारची शारीरिक आणि मानसिक तणावाची कर्तव्य देण्यात येतात. साप्तिहीक सुट्टीच्या आदल्या दिवशी अशा प्रकारची कर्तव्य केल्याने आलेल्या थकव्यामुळे त्यांना मिळणाऱ्या साप्ताहिक सुट्टीचा उद्देश निरर्थक ठरतो. त्यामुळेच ही बाब लक्षात घेऊन पोलीस घटक प्रमुखांनी पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टी पूर्व दिवसाच्या कामकाजाचे नियोजन करावे.

- Advertisement -

पोलिसांच्या ड्युटीच्या तासाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांकडूनही याआधी अनेक पद्धतीने ताण कमी करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले होते. काही ठिकाणी पोलिस अधिक्षकांनी पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता. साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने पोलिस दलातूनच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रतिसादामुळे पोलिस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिसांना मोठा दिलासा देणारा असा हा निर्णय असून साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने कामाचे नियोजन करण्यात येणार असल्याने पोलिसांनाही त्या सुट्टीचा फायदा होईल, असा या आदेशामागचा उद्देश आहे.

police week off order by sanjay pande


- Advertisement -

हेही वाचा – पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात जमावबंदी, बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात


 

- Advertisement -