घरमहाराष्ट्रPolitics: नारायण राणेंची सभा उधळल्याप्रकरणातून 28 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

Politics: नारायण राणेंची सभा उधळल्याप्रकरणातून 28 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयासमोर 2005 मध्ये घेतलेली सभा उधळल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने 28 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली आहे.

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयासमोर 2005 मध्ये घेतलेली सभा उधळल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने 28 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली आहे. (Politics 28 Shiv Sainik acquitted in the case of disrupting Narayan Rane s meeting)

नेमकं प्रकरण काय?

अंतर्गत मतभेदामुळे नारायण राणेंनी 18 वर्षांपूर्वी शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. राणे यांनी पत्र सोडल्याच्या निषेधार्थ या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना नेत्यांसह शिवसैनिक हजर होते.

- Advertisement -

शिवसैनिकांनी राणेंच्या सभेत गोंधळ घालण्याचा आणि सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यात काही जण गंभीर जखमीही झाले होते. याप्रकरणी एकूण 47 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

अरंविद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, अजय चौधरी, दगडू सपकाळ, किरण पावसकर, सूर्यकांत महाडिक, श्रद्धा जाधव, हरिश वरळीकर, रवींद्र वायकर, विशाखा राऊत, सुहास पाटील, विनायक देवरुखकर, सदानंद परब, सूर्यकांत बिर्जे, अशोक केळकर, मनोहर सावंत, प्रदीप शेटये, मनोहर कांबळे, महेश सावंत, ज्योती भोसले, स्वाती शिंदे, इंदुमती माणगावकर, अजित कदम, स्नेहल जाधव, प्रीती देव्हारे, मंगेश भाटकर, प्रकाश पवार या 28 शिवसैनिकांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. दत्तात्रय नलावडे यांचे खटला प्रलंबित असतानाच निधन झालं होतं. त्यामुळे त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं.

- Advertisement -

(हेही वाचा: Maratha Reservation : कोर्टाचा वेळ महत्त्वाचा, चालढकल कशासाठी? न्यायालयाने शिंदे सरकारला फटकारले)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -