घरमहाराष्ट्र'कोविड 19' चाचण्यांना वेग येण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव; राज्य सरकारचं पाऊल

‘कोविड 19’ चाचण्यांना वेग येण्यासाठी ‘पूल टेस्टिंग’चा प्रस्ताव; राज्य सरकारचं पाऊल

Subscribe

राज्य सरकारने केंद्र आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून पूल तपासणीसाठी मागितली परवानगी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ वाढत असताना दिवसेंदिवस कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. कोरोनावर लवकरात लवकर उपचार कसे करता येतील, त्यावर कोणती उपचार पद्धत यशस्वी ठरेल यासाठी अनेक स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. असे असताना कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी ‘पूल टेस्टिंग’चा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तसेच कोविड 19 च्या चाचण्यांना वेग येण्यासाठी राज्य सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचलले आहे.

पूल टेस्टिंगमध्ये एकाच वेळी दहा नुमन्यांची तपासणी होऊ शकते. त्यामुळे हे शक्य झाले तर लॉकडाऊनदरम्यान होणाऱ्या कोरोना व्हायरसच्या तपासण्या वेगाने होण्यास मदत होईल. राज्य सरकारने केंद्र आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून पूल तपासणीसाठी परवानगी देखील मागितली आहे.

- Advertisement -

Corona: देशात २४ तासांत ९०९ नवे रुग्ण, ३४ मृत्यू; एकूण आकडा ८३५६!

इस्त्रायल आणि यूएसच्या काही भागात कोरोना चाचणीसाठी पूल टेस्टिंगचा वापर करण्यात येत असून कमी वेळात जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी करता येणे सोपे झाले आहे. महाराष्ट्रात पूल टेस्टिंगला परवानगी मिळाली तर तपासणीचा वेग दहा पटीने वाढेल. सध्या राज्यात रोज ४ ते ५ हजार तपासण्या करण्यात येत आहेत.

गेल्या ५ दिवसांत रोज ५८४ नवे रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या ५ दिवसांमध्ये सरासरी रोज ५८४ नवे कोरोनाग्रस्त सापडत आहेत. त्याशिवाय, रोज सरासरी १५ हजार ७४७ जणांची कोरोना चाचणी होत आहे. आत्तापर्यंत देशात १ लाख ८६ हजार ९०६ चाचण्या तपासण्यात आल्या असून त्यामध्ये ८ हजाराहून जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे, देशात खरंच कम्युनिटी स्प्रेडची तिसरी स्टेज सुरू झाली आहे का? अशा चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -