घरमहाराष्ट्रराहुल गांधींची 'बालबुद्धी' - पूनम महाजन

राहुल गांधींची ‘बालबुद्धी’ – पूनम महाजन

Subscribe

'राहुल गांधी ५० वर्षांचा नेता असला तरी बालबुद्धी असलेला नेता आहे', अशी टीका पूनम महाजन यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच अप्रत्यक्षपणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला हाणला होता. ‘डिस्लेक्सिया’ आजाराविषयीच्या एका कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. यावेळी या समस्येवर आपल्याकडे तोडगा असल्याचे एका विद्यार्थीनीने त्यांना सांगितले. यावेळी ‘हा उपाय ४०-५० वर्षांच्या मुलालादेखील लागू होईल का?’ असा खोचक प्रश्न मोदींनी उपस्थित केल्यामुळे, मोदींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर टीका केल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान, भाजप खासदार पूनम महाजन यांनी एक पाऊल पुढे जात राहुल गांधींना ‘बालबुद्धी’ म्हटलं आहे. ‘राहुल गांधी ५० वर्षांचा नेता असला तरी बालबुद्धी असलेला नेता आहे’, अशी टीका पूनम महाजन यांनी केली आहे. कुर्ला येथील गृहप्रकल्पाच्या कार्यक्रमात बोलत असताना, राहुल यांच्या मुंबईतील सभेचा दाखला देत पूनम यांनी ही टीका केली.


…तर मी नाव बदलून काम करेन

कार्यक्रमादरम्यान पूनम म्हणाल्या, की ‘राहुल गांधींनी आधी स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर इंच यामधला फरक सांगावा. राहुल गांधींनी मुंबईकरांना सभेदरम्यान ५०० स्केअर फूटची घरं देण्याचं आश्वासन दिलं होत. त्यावरुन पूनम महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘राहुल गांधींनी स्क्वेअर मीटर आणि फूटमधील फरक सांगितला तर, मी नाव बदलून दुसरं काम करेन’, असंही त्या म्हणाल्या. राहुल गांधींवर निशाणा साधत महाजन म्हणाल्या, की ‘५० वर्षांचा तरुण राहुल गांधी वांद्र्यात येऊन गेला आणि ५०० स्क्वेअर फूटची घरं देण्याचं आश्वासन देऊन गेला. मात्र, ५० वर्षाच्या या नेत्याची बुद्धी बालबुद्धीच आहे.’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -