Chipi Airport: ‘दादा तुम्ही करुन दाखवलं’, चिपी विमानतळाबाहर राणे समर्थकांकडून पोस्टरबाजी

राणे समर्थकांनी विमानतळाबाहेर केलेल्या पोस्टरबाजीवरुन राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता

Poster campaign by Rane supporters outside Chipi Airport on inauguration of chipi airport
Chipi Airport: 'दादा तुम्ही करुन दाखवलं', चिपी विमानतळाबाहर राणे समर्थकांकडून पोस्टरबाजी

गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदूर्गातील चिपी विमातळाचे ( Sindhudugr Chipi Airport) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM UddhavThackeray) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) देखील चिपी विमानतळावर उपस्थितीत राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर चिपी विमानतळावरुन श्रेयवाद पहायाल मिळत आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या बाहेर राणेसमर्थकांनी जोरदार पोस्टबाजी केलेली पहायला मिळत आहेत.  राणे समर्थकांनी विमानतळाबाहेर केलेल्या पोस्टरबाजीवरुन राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

चिपी विमानतळावर राणे समर्थकांकडून ‘दाद तुम्ही करुन दाखवल’, असे लिहिलेले मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. विमानतळाच्या श्रेयवादावरुन राणे समर्थकांकडून पोस्टरच्या माध्यमातून चांगलेच शक्तीप्रदर्शन केलेले पहायला मिळत आहेत. एवढेच नाही तर ‘कोकणात शक्तीप्रदर्शने फक्त नारायण राणेच करू शकतात. वाघाच्या गुहेत येऊन कोणीही शक्तीप्रदर्शन करू शकत नाही’, असा सणसणीत टोला भाजपने शिवसेनेला लगावला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोकणावासीय विमानतळ सुरू होण्याची वाट पाहत होते. तब्बल २० वर्षांची प्रतिक्षा आज संपणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावरुन चिपीकडे रवाना झाले आहेत. उद्घाटनावेळी राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही,असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले आहे.


हेही वाचा – Chipi Airport : भ्रष्टाचाराने बुडलेल्यांनी आरोपाचे धाडस करू नये, राऊतांचा राणेंवर पलटवार