Chipi Airport : कोकणात गणेशोत्सव २०२२ बुकिंग सुरू, फ्लाईटची उरली थोडीच तिकिटे

sindhudurg chipi airport

चिपी विमानतळाचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज होणार आहे. चिपी एअरपोर्टला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) मार्फत एरोड्रोम परवाना मिळाल्यानंतर फ्लाईट बुकिंगसाठी सुरूवात झाली होती. त्यातच एअर इंडियाने या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठीच्या बुकिंग खुल्या केल्या आहेत. आगामी गणेशोत्सव २०२२ साठीच्या बुकिंग सध्या उपलब्ध आहेत. एअरपोर्ट ऑपरेशनल होण्याआधीच कोकणात फ्लाईट्सची बुकिंग सुरू झाली आहे हे विशेष. विशेष म्हणजे आगामी गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना फ्लाईट्सचे तिकिट बुक करायलाही सुरूवात केली आहे. एअऱ इंडियाच्या वेबसाईटवर गणेशोत्सव २०२२ साठीची तिकिटे फुल्ल झाल्याचे दिसत आहे.

आगामी २०२२ वर्षात गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टला सुरूवात होत आहे. तर अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबरला आहे. पण या कालावधीत एअर इंडियाची तिकिटे संपल्यात जमा आहे. अवघी एखादी किंवा दुसरे तिकिट वेबसाईटवर उपलब्ध आहे. एअर इंडिया दररोज अशी सेवा मुंबई ते सिंधुदुर्ग एअरपोर्टसाठी देणार आहे. आजपासूनच एअर इंडियाच्या सेवेला सुरूवात होत आहे. एअर इंडिया ही पहिली कंपनी आहे, ज्या माध्यमातून ग्रीनफिल्ड एअरपोर्टला सेवा देण्यात येईल.

फ्लाईटचे तिकीट किती ?

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सिंधुदुर्ग (चिपी एअरपोर्ट) या प्रवासासाठी १८ ऑगस्ट २०२२ या तारखेसाटीचे तिकीट १८९० रूपये आहे. तर सर्व करासह या प्रवासासाठी २५२० रूपये ते २६२१ रूपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतून दरवर्षी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. चिपी एअरपोर्ट ऑपरेशन होणार याची घोषणा होताच कोकणवासीयांना हवाई प्रवासालाही पसंती दिली आहे.

कसे आहे वेळापत्रक

अलायन्स एअर फ्लाईट 9I661 ही फ्लाईट मुंबईतून ११.३५ वाजता सुटेल. ही फ्लाईट सिंधुदुर्गात १ वाजता पोहचेल. तर परतीच्या प्रवासासाठी ही फ्लाईट १.२५ वाजता सिंधुदुर्गातून सुटेल आणि मुंबईत २.५० वाजता पोहचेल.


हेही वाचा – Chipi Airport : भ्रष्टाचाराने बुडलेल्यांनी आरोपाचे धाडस करू नये, राऊतांचा राणेंवर पलटवार