अखेर सरकारी कर्मचारी भरतीच्या पॅनेलला स्थगिती

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे राज्य सरकारने कर्मचारी भरती टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएलच्या माध्यमातून या परीक्षा घेऊन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता.

mhada and mpsc exam will be held on same day student

राज्य सरकारच्या विविध विभागात होणार्‍या सरकारी कर्मचारी भरतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपन्यांच्या पॅनेलला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. तर शासकीय विभागातील पद भरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, म्हाडामधील कर्मचारी भरतीच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पेपरफुटीच्या मुद्यावरून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे राज्य सरकारने कर्मचारी भरती टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएलच्या माध्यमातून या परीक्षा घेऊन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. तशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही केली होती.

या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात नसणार्‍या राज्यातील विविध पदांच्या भरतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कंपन्यांच्या पॅनेलला स्थगिती दिली आहे. आता या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल या कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत.