घरमहाराष्ट्रआम्ही नियम मोडण्यासाठीच आलोय - प्रकाश आंबेडकर

आम्ही नियम मोडण्यासाठीच आलोय – प्रकाश आंबेडकर

Subscribe

विठ्ठल मंदिर परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळालं

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूरमध्ये राज्यातील मंदिरं खुली करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. याकरता पंढरपूर येथील शिवाजी चौकात विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात दाखल झाले असून त्यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले. यावेळी शेकडो वंचित कार्यकर्ते आक्रमक झाले असून बॅरिकेट्स पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याशिवाय अनेकांनी मास्कदेखील घातलेला नाही. याबद्दलच आंबेडकरांना विचारणा केली असता, त्यांनी असे उत्तर दिले की, ”आम्ही इथे नियम पाळण्यासाठी नव्हे, तर नियम मोडण्यासाठीच आलोय”

मंदिर प्रवेश करण्याच्या निर्णयावर ठाम 

यावेळी ते असेही म्हणाले की, मंदिरं खुली करण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मंदिरं खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे. दरम्यान कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच, या भूमिकेवर ठाम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी आंबेडकर यांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. बॅरिकेट्स तोडू नका. प्रशासनाला सहकार्य करा, एकमेकांना चिटकून उभे राहू नका, असं आंबेडकर म्हणाले. लोकांना आम्ही फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा अशी विनंती करत आहोत. पण कार्यकर्ते ऐकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.

कारवाई करा,काही करा; मंदिर प्रवेश करणारच

यावेळी ४५० पोलिस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असल्याचे सांगण्यात आले तर मंदिर खुली करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. लोकांच्या भावनेचा सरकारने विचार करावा, कारवाई करा किंवा काही करा, तरी मंदिर प्रवेश आम्ही करणारच, असेही त्यांनी म्हटले आहे.


‘पंढरपूरमधील आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिरं होणार खुली’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -