घरताज्या घडामोडीजरंडेश्वर साखर कारखान्याची बंद फाईल उघडणार का ? दरेकरांचा सवाल

जरंडेश्वर साखर कारखान्याची बंद फाईल उघडणार का ? दरेकरांचा सवाल

Subscribe

राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून माझ्याविरोधात चौकशी लावून अनेक प्रकारे दबाव आणला जात आहे, त्या दबावाला मी बळी पडणार नाही. जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची, प्रश्न मांडण्यांची माझी जबाबदारी आहे. कितीही दबाव आणला तरीही मी या दबावाला बळी पडणार नाही. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची आतापर्यंत पाचवेळा चौकशी करण्यात आली आहे. सहाव्यांदा चौकशीला जाण्यासाठी आमची तयारी आहे. पण त्याचवेळी ४०० कोटींच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची बंद केलेली फाईल पुन्हा चौकशीसाठी उघडणार का ? असा सवाल राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी विचारला. बॅंकेच्या चौकशीपेक्षा अनेक साखर कारखान्यांची चौकशी करण्यात यावी असेही आवाहन दरेकर यांनी केला आहे.

एखाद्या आर्थिक संस्थेची बदनामी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की, अशा आर्थिक संस्थेवर अनेक पोट असतात. त्यामुळेच अशा बॅंकांच्या बाबतीत वावटळ उठवताना अनेक अवलंबून असलेल्या खातेधारकांचाही विचार होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. केवळ राजकीय सूडापोटी ही चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळेच ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेता म्हणून माझ्याविरोधात चौकशीचा दबाव आणला जात आहे. जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची, प्रश्न मांडण्यांची माझी जबाबदारी आहे. कितीही दबाव आणला तरीही मी या दबावाला बळी पडणार नाही, असेही ते म्हणाले. आर्थिक अडचणीत असलेली बॅंक आम्ही फायद्यात आणलेली आहे. तसेच मुंबईकरांच्या हक्काच्या राजस्थानच्या १०० कोटींच्या ठेवी पुन्हा एकदा बॅंकेकडे आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच मजुर संस्थाना सभासदत्व देण्याचेही संचालक मंडळाच्या निर्णयानंतरच निश्चित झाल्याचे ते म्हणाले. सातही मुद्द्यांवर आम्ही उत्तरे द्यायला तयार आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सहाव्यांदा चौकशी करावी असेही ते म्हणाले.

- Advertisement -

उमेदवाराबाबत भूमिका योग्यवेळी घेणार

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक येत्या दोन दिवसांच्या अधिवेशनात होण्यासाठीची तयारी नसल्याचे दिसते. पण आयत्यावेळीही ही निवडणूक होऊ शकते. पण विधानसभा अध्यक्षाच्या नेमणुकीसाठी आयत्यावेळी निवडणूक लागू शकते असा अंदाजही दरेकर यांनी व्यक्त केला. त्यामुळेच आम्ही योग्य वेळी उमेदवार देण्याचा निर्णय घेऊ असे दरेकर यांनी सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -