घरताज्या घडामोडीसुशांत राजपूतचं प्रकरण पुन्हा काढण्यास भाग पाडू नका, ड्रग्ज प्रकरणावरुन दरेकरांचा इशारा

सुशांत राजपूतचं प्रकरण पुन्हा काढण्यास भाग पाडू नका, ड्रग्ज प्रकरणावरुन दरेकरांचा इशारा

Subscribe

राऊतांनी महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार, हत्या, बलात्कार, या विषयी राज्य सरकारला सल्ला द्यावा.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थाचे प्रकरण समोर आले होते. सुशांतच्या प्रकरणातील माहिती महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे परंतु त्या प्रकरणातील माहिती पुन्हा बाहेग काढण्यासाठी भाग पाडू नका असा थेट इशारा विधानपरिदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजप नेते गांजा मारुन वक्तव्ये करत असल्याची टीका केली होती. राऊतांच्या टीकेला दरेकरांनी सणसणीत उत्तर देत शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे. संजय राऊतांनी खालच्या पातळीवर टीका केली असल्याचेही दरेकरांनी म्हटलं आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. दरेकरांनी म्हटलं आहे की, संजय राऊतांनी अत्यंत खालच्या पातळीवरची टीका कधी नव्हे अशी टीका केली आहे. भाजपचे नेते गांजा घेतात अशी टीका केली आहे. अमली पदार्थांची बाजू कोण घेते हे जनतेला माहिती आहे. सुशांत सिंह प्रकरणात काय झाले महाराष्ट्राला माहिती आहे. पुन्हा काढण्यास भाग पाडू नका असा इशारा शिवसेनाला दिला असून कोणाचे जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे हे लोकांना माहिती आहे. गांजा, अमली पदार्थांवरुन भाजपवर टीका करताना गांजा, अमली पदार्थाच्या पाठिंब्यासाठी कोण उभं राहते आणि कोण कारवाईसाठी उभं राहते हे महाराष्ट्र पाहत आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

संजय राऊतांनी महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार, हत्या, बलात्कार, या विषयी जर राज्य सरकारला सल्ला देऊन काय कारवाई झाली तर आम्ही अभिनंदन करु असा सल्ला दरेकरांनी संजय राऊत यांना दिला आहे.

राऊत तुम्ही काळजी करु नका अमित शाह सक्षम

जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरुन राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. यावर दरेकरांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारची बदनामी होत आहे. त्यामुळे शरद पवार यांना सुद्धा रोज झालेल्या विषयांसाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा या गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या गोष्टींची चर्चा करुन झाली आहे त्याच यंत्रणांचा संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतो आहे. ३७० कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये सुधारणा झाली नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊतांनी सांगावं ते एका बाजूला म्हणतात ३७० कलम काढल्याचा अभिमान आहे मग हे कलम काढलं तर चूक झाली का? तुम्ही काळजी करु नका देशाचे गृहमंत्री सक्षम आहेत. तिकडे सर्जिकल स्ट्राईक, टोकाची कारवाई करण्याची धमक असल्याचे अनेक निर्णय घेऊन दाखवले आहेत असे प्रत्युत्तर दरेकरांनी दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘तुमचं अर्धे मंत्रिमंडळ उपऱ्यांचे असताना भाजपवर टीका करणं किती संयुक्तिक’?, दरेकरांचा राऊतांवर पलटवार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -