घरमहाराष्ट्रनाशिकNarendra Modi माता-भगिनींवरून शिवीगाळ करू नका, नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन

Narendra Modi माता-भगिनींवरून शिवीगाळ करू नका, नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन

Subscribe

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरूवात नाशिक दौऱ्यापासून झाली. यावेळी नाशिकमध्ये जवळपास 40 गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा रोड शो झाला. त्याचप्रमाणे लेझीम, पेशवाई पथक, ढोल ताशांच्या गजरात नरेंद्र मोदींच स्वागत करण्यात आलं. नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील 27 व्या युवा महोत्सवांच नरेंद्र मोदींकडून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी युवा महोत्सवाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी कानमंत्र दिले. ते म्हणाले की, मेड इन इंडिया उत्पादनाचा युवकांनी उपयोग करावा, नवीन मतदारांनी मतदानासाठी नोंदणी करावी, युवकांनी मद्यपानापासून दूर राहावे आणि ड्रग्जच्या आहारी जाऊ नये. तसेच आई-बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा… PM Modi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक, मुंबई दौऱ्यावर; शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचे उदघाटन

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, आमच्या सरकारला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या 10 वर्षामध्ये आम्ही युवकांच्या पंखाना बळ देण्याचं काम केलं. माझा भारताच्या युवा पिढीवर सर्वात जास्त विश्वास आहे. मेरा युवा भारत संघटनेच्या स्थापनेनंतर हा पहिला युवा दिन आहे. या संघटनेला स्थापन होऊल 75 दिवस देखील झाले नाही, तोपर्यंत 1 कोटी 10 लाख युवकांनी नोंदणी केली. तुमचे सामर्थ्य, सेवाभाव देशाला, समाजाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. तुमचे सामर्थ्य, सेवाभाव देशाला, समाजाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. तुमचे प्रयत्न, मेहनत ही युवा भारताच्या शक्तीचा संपूर्ण जगात झेंडा रोवणार आहे. युवक ज्यारितीने देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडला जातोय त्यामुळे मी उत्साहित आहे. असे मोदी म्हणाले.

आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा, मद्यपानापासून दूर राहा

- Advertisement -

तुम्हाला काही सूत्रं लक्षात घ्यावी लागतील. लोकल उत्पादनाला प्रोत्साहित करा. नशेपासून दूर राहा. ड्रग्जपासून दूर राहा. आई, मुलगी, बहीण यांच्या नावाने शिव्या देऊ नका. अशा शिव्या देण्याच्या सवयींविरोधात आवाज उठवा. हे प्रकार बंद करा. मी लालकिल्ल्यावरून हाच आग्रह धरला होता, असे वक्तव्य यावेळी मोदींकडून करण्यात आले. त्यामुळे ज्या नाशिकमधून ड्रग्जची सर्वाधिक प्रकरणे समोर आली, त्याच नाशिकमधून आज मोदींनी ड्रग्जपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तर, अमृतकाळच्या आजच्या तरुण पिढीवर माझा खूप विश्वास आहे. या कालखंडात देशातील अशी युवापिढी तयार होत आहे जी गुलामीच्या दबावात आणि प्रभावापासून मुक्त आहे. भारताची युवा पिढी आयुर्वेदाचे ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

मेड इन इंडिया उत्पादनाचा उपयोग करा

देशातील युवकांना सर्वात स्वस्त मोबाईट डेटा मिळत आहे. युवा वर्ग कधी मागे राहत नाही. देशाचे भविष्य युवा आहे. तो स्वत: नेतृत्व करायला पुढे येत आहे. मेड इन इंडिया, आयएनएस विक्रांत, चंद्रयान यासारखं यश आपण मिळवले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही भारत जगाचे नेतृत्व करायला लागला आहे. अमृतकाळात युवकांना भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. भारतात मोठमोठ्या मॉलपासून ते लहान विक्रेत्यांपर्यंत UPI पेंमेट केले जात आहे. देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचे आहे. आपल्याला सर्व्हिस, आयटी सेक्टरसह जगातील मॅन्युफॅक्चरिंग हब भारताला बनवायचे आहे. अस नरेंद्र मोदी यांनी युवकांना सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -