घरमहाराष्ट्रपोलीस दलातील 23 पोलीस अधिकार्‍यांना बढती आणि बदली

पोलीस दलातील 23 पोलीस अधिकार्‍यांना बढती आणि बदली

Subscribe

राहुल ज्ञानदेव मदने यांची नागपूरच्या पोलीस उपायुक्त, रिना यादवरावजी जनबंधू यांची चंदपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक, आश्विनी परमानंद पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई: राज्य पोलीस दलातील 23 पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या 23 पोलीस अधिकार्‍यांना बढती देण्यात आली आहे. बढतीनंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. बढती आणि बदल्याचे आदेश बुधवारी सायंकाळी गृहविभागाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे काही अधिकारी बढतीच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांच्या बढतीसह बदलीचे आदेश बुधवारी गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे.

जयंत नामदेव बजबळे यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पीयूष विलास जगताप यांना यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक, बाबूराव भाऊसाहेब महामुनी यांची बुलढाणा येथील अप्पर पोलीस अधीक्षक, अश्विनी सयाजीराव पाटील यांची नागपूरच्या पोलीस उपायुक्त, शिलवंत रघुनाथ नांदेडकर यांची औरंगाबाद पोलीस उपायुक्त, प्रशांत अशोकसिंग परदेशी यांची मुंबईच्या मंत्रालय सुरक्षा विभागाच्या पोलीस उपायुक्त, प्रिती प्रकाश टिपरे यांची नवी मुंबईच्या डायल 112 च्या पोलीस उपायुक्त, समीर नजीर शेख यांची पोलीस महासंचालक, राज्य नियंत्रण कक्षाच्या पोलीस अधीक्षक, राहुल ज्ञानदेव मदने यांची नागपूरच्या पोलीस उपायुक्त, रिना यादवरावजी जनबंधू यांची चंदपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक, आश्विनी परमानंद पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

अमोल विलास गायकवाड यांची भारतर राखीव बटालियन क्रमांक दोनच्या समादेशक, कल्पना माणिकराव भराडे यांची नागपूरच्या अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, ईश्वर मोहन कातकडे यांची भंडारा येथील अप्पर पोलीस अधीक्षक, प्रीतम विकास यावलकर यांची महाराष्ट्र राज्य सायबर सेलच्या पोलीस अधीक्षक, अर्चना दत्तात्रय पाटील यांची मुंबईच्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या पोलीस अधीक्षक, दत्ता लक्ष्मण तोटेवाड यांची पोलीस महासंचालक कार्यालयातील अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती विभागात, रत्नाकर ऐजीनाथ नवले, शीतल सुरेश झगडे आणि पंकज नवनाथ शिरसाट यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्त, नवनाथ ठकाजी ढवळे यांची ठाण्याच्या पोलीस उपायुक्त आणि सागर रतनकुमार कवडे यांची मुंबईच्या एटीएसच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक तानाजी वीरकर यांची बदली दाखविण्यात आली नसून लवकर त्यांच्या बदलीचे आदेश निघतील असे सांगण्यात आले.


हेही वाचाः अंधेरी पूर्वसाठी उद्या मतदान, भाजपाची माघार पण सात उमेदवार रिंगणात, कोण मारणार बाजी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -