घरमहाराष्ट्रनाशिककांद्यावर मोदींचे चित्र रेखाटत निषेध

कांद्यावर मोदींचे चित्र रेखाटत निषेध

Subscribe

व्यंगचित्रकार किरण मोरेंचा प्रयत्न

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरांत सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या निषेधार्थ सटाणा येथील एका शेतकर्‍याने २० कांद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र साकारत अनोख्या पद्धतीने दर घसरणीचा निषेध केला. या शेतकर्‍याने एका कांद्यावर दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांचेही चित्र रेखाटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकर्‍यांसाठी पुरेसे काम करत नाहीत. त्यांचे शेतकर्‍यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या कष्टाने या शेतकर्‍याने कांद्यावर बारीक कलाकुसर केली आहे. या अनोख्या संकल्पनेमागील शेतकरी अर्थात किरण मोरे म्हणाले की, आज बाजारात कांद्याला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अशाप्रकारे कांद्यावर पंतप्रधान मोदींचे चित्र रेखाटले आहे. आज कांदा टिकला, पण भाव टिकला नाही. अशा स्थितीत शेतकर्‍याने जगायचे कसे. रात्रीचा दिवस करुन पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कोणतेही सरकार सत्तेवर असू द्या, त्या सरकारला शेतकरी विरोधी धोरणे राबवण्यात जास्त आनंद वाटत असल्याचे मत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. शेतकरी कायम संकटात असला पाहिजे, त्याला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळू नये ही सरकारची भूमिका आहे. शेतकर्‍यांना आंदोलन करुनही काही मिळत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चाचा विचार होणे आवश्यक आहे. विद्यापीठे असो किंवा संस्था या शेतकर्‍यांच्या बाजूने नसल्याच्या शब्दांत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -