घरमहाराष्ट्रपुणे-सोलापूर मार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात; ९ ठार

पुणे-सोलापूर मार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात; ९ ठार

Subscribe

मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ९ तरूणांचा जागीच मृत्यू

लोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकचा हा अपघात मध्यरात्री झाला असूनया भीषण अपघातात कारमधील ९ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. साधारण पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते. हे सर्वजण रायगडला सहलीला गेले होते. सहलीवरून घरी परतत असताना लोणी काळभोर येथे ही दुर्दैवी घटना घडली.

- Advertisement -

हा अपघातातील ठार झालेले ९ तरूण हे रायगड येथून परतत असताना अपघातादरम्यान त्यांचा अपघाती मृत्यू झाला.  मध्यरात्री झालेल्या अपघातात या तरूणांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. समोरून येणाऱ्या वेगवान ट्रकला या कारने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातातील सर्व तरुणांचे मृतदेह पुण्यात असणाऱ्य़ा ससून रूग्णालयामध्ये आणण्यात आले आहे. दरम्यान लोणी  पोलीस हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

अशी घडली घटना 

यवत येथे राहणारे हे ९ तरूण शुक्रवारी सकाळी रायगड जिल्ह्यात फिरायला गेले होते. रायगडावरून परत येत असताना कदम वाक वस्ती या गावाजवळ गाडी चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये अर्टिगा कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोरजवळील कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर मध्यरात्री ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीजवळ ही घटना घडली.

अपघातातील मृतांची नावे

शुभम रामदास भिसे (वय १९)
विशाल सुभाष यादव ( वय २०)
निखिल चंद्रकांत वाबळे (वय २०)
अक्षय चंद्रकांत शिगे ( वय २०)
दत्ता गणेश यादव ( वय २०)
अक्षय भरत वायकर ( वय २२)
नूरमोहम्मद आबास दाया ( वय २२)
परवेज अशपाक आतार ( वय २१)
जुबेर अजीज मुलाणी (वय २१)

मृतांमधील दत्ता गणेश यादव हा हडपसर ( उंड्री) भागातील JSPMS महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा विश्वराज हॉस्पिटलमध्ये बाऊन्सरचे काम करायचाय तर विशाल सुभाष यादव हा वाघोली गावातील JSPMS महाविद्यालयात शिकत होता. शुभम भिसे हा उरळी कांचन जवळील कासुर्डी गावातील महात्मा गांधी महाविद्यालयात BCS चे शिक्षण घेत होता तर अक्षय चंद्रकांत दिघे हा हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात BSC च्या शेवटच्या वर्षाला होता.

नुरमोहम्मद दारा हा लोणी काळभोर मधील महाविद्यालयात बी एच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. परवेज अशपाक आत्तार आझम कॅपसमधील पुणा कॉलेजमधे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अक्षय वायकरचा स्वत:चा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता तर जुबेर मुलाणी हा लोणी काळभोर जवळ नोकरी करत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -