घरमहाराष्ट्रपुण्याला जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत; मदुराई एक्सप्रेसचा डबा घसरला

पुण्याला जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत; मदुराई एक्सप्रेसचा डबा घसरला

Subscribe

खंडाळा येथे मदुराई एक्सप्रेसचा डबा घसरल्याने मुंबईहून पुण्याला निघालेल्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. या ठिकाणी बोगी हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

खंडाळा येथे मदुराई एक्सप्रेसचा डबा घसरल्याची घटना मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून पुण्याला निघालेल्या एक्सप्रेस १५ मिनिटे उशीराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. बोगी हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून एक्सप्रेसचा डबा मोकळा करून उर्वरीत गाडी पुढे मार्गस्थ करण्यात आली आहे. मात्र याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे काही गाड्या इतर मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. तर सिंहगड, प्रगती आणि इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -