घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत यंदा दुप्पट मतदान

पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत यंदा दुप्पट मतदान

Subscribe

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट मतदान झाले. सर्व केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया अतिशय उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात पार पडली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधर मतदारांमधून एकूण १० प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली. १ जून पासून सुरू झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत विद्यापीठाचे दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी काम करत होते. अतिशय कडेकोट बंदोबस्तात व नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाकडून पार पडली. रविवारी (दि.२०) सकाळपासूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील केंद्रासह सर्वच केंद्रांवर मोठा उत्साह होता. दुपारच्या वेळातही अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच, विद्यार्थी मतदानासाठी येत होते. संध्याकाळी पुन्हा हा ओघ थोडा वाढत अखेर पाच वाजता केंद्रांवर शांततापूर्ण वातावरणात पार पडले. मुख्य म्हणजे तरुण विद्यार्थ्यांसह, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांनीही या मतदानाला हजेरी लावली होती.

- Advertisement -
सिडकोत वातावरण तापले

कोणतीही निवडणूक असो नाशिकपेक्षा सिडकोत प्रथमत: निवडणुकीचे वातावरण तापत असल्याचे चित्र आहे. सिनेट निवडणुकीत सिडकोत शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे एकमेकांविरोधात आल्याने निवडणुकीचे वातावरण तापले होते. या निवडणुकीत अभाविप विद्यापीठ विकास मंचच्या माध्यमातून सिनेट निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रगती पॅनल आहे. यात विकास मंच व प्रगती पॅनल यांच्यात लढत आहे. या निवडणुकीचे सिडकोतील उत्तमनगर येथील वावरे महाविद्यालयात मतदान केंद्र असून या केंद्राबाहेर प्रगती पॅनल व विकास मंच यांच्यात लढत आहे. उत्तमनगर येथील मतदान केंद्राबाहेर महाविकास आघाडीच्या प्रगती पॅनलचे नेतृत्व शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. तर, अभाविप विद्यापीठ विकास मंचच्या पॅनलला माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी पाठिंबा दिला. सिडकोतील उत्तमनगर येथील मतदान केंद्राबाहेर शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे एकमेकांसमोर आल्याने परिसरातील वातावरण तापले होते. तर, दुसरीकडे त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -