घरताज्या घडामोडीपुणे : जादूटोण्याच्या बहाण्याने बलात्कार पीडितीवर पुन्हा बलात्कार

पुणे : जादूटोण्याच्या बहाण्याने बलात्कार पीडितीवर पुन्हा बलात्कार

Subscribe

जादूटोण्याच्या बहाण्याने बलात्कार पीडितीवर पुन्हा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते. मात्र, अटक पूर्व जामिन्यावर त्याला सोडण्यात आले होते. दरम्यान, मोकाट फिरणाऱ्या आरोपीकडून पुन्हा एकदा पीडितीवर बलात्कार केल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पीडित महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. तर या घटनेचा सध्या व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

नेमके काय घडले?

पीडित महिला ही बाहेरील गावातून आली असून आपले पोट भरण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून ती पेरणे येथे वास्तव्य करत आहे. तर आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पीडिती महिलेच्या पतीने आरोपी राहुल वाळके याच्याकडून उसणे पैसे घेतले होते. याचाच फायदा घेत आरोपीने पीडिती महिलेशी मैत्री करत जादूटोण्याचा वापर करत पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला.

- Advertisement -

दरम्यान, पीडित महिलेने याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्थानकात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यामुळे आरोपी पीडित महिलेला सातत्याने धमक्या देत होता. या धमक्यानपासून सुटका करण्यासाठी महिलेने आपले घर बदलून कोरेगाव भीमा येथे आली होती. परंतु, आरोपीने येथेही येऊन महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. तर बुधवारी रात्री आरोपीने पीडित महिलेचे घर गाठत तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न करत तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्थानकामध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करुन त्याच्यावर कडक कारवाई करु, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे.


हेही वाचा – शरीरसुख न दिल्याने मेहुणीस मारहाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -