घरमहाराष्ट्रपुणेLok Sabha : धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश; माढ्यातून 16...

Lok Sabha : धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश; माढ्यातून 16 तारखेला भरणार अर्ज

Subscribe

धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण उगारले होते. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. अशातच आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे प्रवेश केला आहे. ते माढा लोकसभा मतदारसंघातून येत्या 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडली. तसेच भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर पडद्यामागे काय-काय घडामोडी घडल्या, याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. (Lok Sabha Election 2024 Dhairyasheel Mohite Patil enters Sharad Pawar group)

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना शरद पवार यांच्यासोबत येण्याच्या त्यांच्या निर्णयावर बोलताना म्हटले की, मी दिवाळी पाडव्याला खासदारकीची इच्छा असल्याचे म्हटले होते. त्यानुसार मी माझ्या मतदारसंघात फिरत होते. भाजपची 13 मार्चला उमेदवारी यादी जाहीर झाली. त्यात माझे नव्हेत. त्यामुळे मी म्हटलं आता घरी बसू आणि पुढच्यावेळेस संधी मिळेल तेव्हा बघू. पण माळशिरस तालुक्याची जनता तसेच माढा लोकसभेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने मोठ्या दादांना आणि बाळादादांना भेटायला सुरू केली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : काँग्रेसने 60 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं? राहुल गांधींच्या टीकेवर फडणवीसांचा सवाल

धैर्यशील मोहिते पाटलांना आमच्या गावात पाठवा, आम्हाला त्यांना भेटायचं आहे. बाळादादांनी मला प्रत्येक गावात जाऊन लोक काय म्हणतात ते ऐकून घेण्यास सांगितले. गावात गेल्यावर आमच्या आजोबांपासून ते रणजित दादा यांनी त्यांच्याकडे पदे असताना लोकांना काय-काय दिल याची आठवण सांगण्यास सुरुवात केली. एका गावात तरुणांनी सांगितलं की, उभं राहणार असाल तर या नाहीतर गाडीत बसून निघून जा. ज्या गावात जाईल तिथे हाच हट्ट सुरू होता. मी हे सर्व माझ्या कुटुंबीयांना सांगत होतो, असा अनुभव धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितला.

- Advertisement -

16 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज (Nomination form will be filled on April 16)

दुधाचे दर, शेतकऱ्यांची अवस्था, पाण्याचे प्रश्न ऐकल्यावर मी एका दिवशी ठरवलं की, या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना चांगला कारभारी पाहिजे. चांगला कारभार करण्याची शिकवण आम्हाला सहकार महर्षी आणि मोठ्या दादांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रश्न होता काय निर्णय घ्यायचा? काही जणांनी म्हटले की, मागच्या वेळेस शरद पवारांना सोडून गेला होतात. त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही. कारण 60 ते 65 वर्षात शरद पवार आणि दादांनी एकमेकांची दोस्ती व ऋणानुबंध जपले आहेत. हे सर्व मी सांगण्यापेक्षा मेहबूब भाऊ शेख यांनी त्यामागचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे आता फार कोणी प्रश्न विचारू नका. आपण 16 तारखेला पुन्हा भेटणार आहोत, असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा – Narayan Rane : बाळासाहेबांनी विरोध केला, तिथेच…; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -