घरमहाराष्ट्रLok Sabha : काँग्रेसने 60 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं? राहुल गांधींच्या टीकेवर...

Lok Sabha : काँग्रेसने 60 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं? राहुल गांधींच्या टीकेवर फडणवीसांचा सवाल

Subscribe

काँग्रेसने 60 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला ओबीसी म्हणवतात, पण त्यांच्या सरकारने ओबीसींची जातगणना केली नाही. दलित, आदिवासी, शेतकरी, महिला व युवकांचे  प्रश्न साेडवले नाहीत. धाेरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत या वर्गाला भूमिकाच नाही. त्यामुळे माेदींनी ओबीसी वर्गासाठी काय केलं हे सांगावे? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी भंडाऱ्यातील प्रचार सभेत उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते आज भंडाऱ्यातील साकोली येथे सुनील मेढेंच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते. (Lok Sabha Election 2024 What has Congress done for OBCs in 60 years DCM Devendra Fadnavis)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे घटक पक्ष आहेत. महायुतीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई आणि आता मनसेही आली आहे. आमच्या महायुतीचे इंजिन हे नरेंद्र मोदी आहेत. आमचे सर्व डब्बे इंजिनला जोडलेले आहेत. ही विकासाची ट्रेन आहे आणि या ट्रेनमध्ये गोरगरिब, शेतकरी, मजूर, ओबीसी, अल्पसंख्याक असे प्रत्येकजण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढे जात आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Amit Shah : भाजपा आरक्षण हटवणार नाही; अमित शहांनी विरोधकांना सुनावले

राहुल गांधींवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांच्या ट्रेनला फक्त इंजिन आहे, पण डब्बे नाहीत. इंजिनमध्ये कोणाला बसण्याची संधी असते का? असा सवाल करत इंजिनमध्ये केवळ चालक बसतो आणि त्यांच्याकडे एकही इंजिन नाही. राहुल गांधी. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे. पण त्यांचे सर्व इंजिन विरुद्ध दिशेने चालले आहेत. इंजिन कोणी बारामतीकडे ओढतो तर कोणी मुंबईकडे ओढत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे विरोधकांचे जागेवरचं इंजिन हलत नाही. अशी ठप्प गाडी घेऊन राहुल गांधी चालले आहेत. परंतु आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या गाडीत बसून पुढे जायचे आहे. त्यासाठी ही निवडणूक आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेसने 60 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं? (What did Congress do for OBCs in 60 years?)

राहुल गांधी काल भंडाऱ्यात आले होते. ते काय म्हणतात हे कोणालाही समजत नाही. कधी ते म्हणतात एकाबाजूने बटाटा टाकला की, दुसऱ्या बाजूने सोने निघते. कधी म्हणतात पांडवांनी जीएसटी लावला होता का? त्यांनी ओबीसींबद्दल विधानं केलं. पण मी राहुल गांधी यांना आव्हान देतो की, त्यांनी 60 वर्षे या देशात राज्य केलं. त्यामुळे त्यांनी ओबीसींसाठी काय काम केलं हे सांगावं. आम्ही 10 वर्षात काय काम केलं ते  सांगू शकतो. काँग्रेसच्या 60 वर्षांच्या काळापेक्षा जास्त काम मोदींच्या काळात झालेलं आहे, असा हल्लाबोलही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चढवला.

हेही वाचा – Amit Shah : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचं अमित शहांनी सांगितलं कारण, म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -