घरमहाराष्ट्रपुणेNikhil Wagle : भेकड सरकारकडून आता पोलिसांचा वापर सुरू; पुण्यातील घटनेप्रकरणी विरोधक...

Nikhil Wagle : भेकड सरकारकडून आता पोलिसांचा वापर सुरू; पुण्यातील घटनेप्रकरणी विरोधक आक्रमक

Subscribe

पुणे : ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे आज पुण्यात होते. मात्र संध्याकाळच्या वेळेला भाजपा कार्यकर्त्यांनी निर्भया बनो कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवरही हल्ला केला. यानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. (Nikhil Wagle Bhekad government is now using police The opposition is aggressive in the case of the incident in Pune)

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करताना म्हटले की, निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांची आज पुण्यात होणारी “निर्भय बनो” सभा, होऊ नये म्हणून या राज्यातील भेकड सरकारने आता पोलिसांचा वापर सुरू केला आहे. वागळे आणि सरोदे यांना त्यांच्या घरीच स्थानबद्ध केल्याची बातमी कळते आहे. या देशाचं संविधान हे इथल्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार देते.

- Advertisement -

एकीकडे “निर्भय बनो”च्या आयोजकांनी रीतसर सगळ्या परवानग्या घेऊन या सभेचे आयोजन केले होते. असं असतानाही या आयोजकांनाच स्थानिक पोलीस स्थानबद्ध करतात. तर दुसरीकडे पुण्याचे भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांनी ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यावर मात्र पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. थोडक्यात विरोधात असणाऱ्या प्रत्येक आवाजाला दाबण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे. पण त्यांना मी हे सांगू इच्छितो, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तुम्ही एक सभा पोलीसी बळाचा वापर करून बंद पाडाल. परंतु यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या सभेचे नियोजन करण्यात आमच्यासारखी मंडळी सगळ्यात पुढे असतील आणि याची सुरुवात आम्ही ठाण्यातून करू, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

- Advertisement -

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, “निर्भय बनो”कार्यक्रमातील प्रमुख वक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे आणि डॉ. विश्वंभर चौधरी यांच्यावर भाजपाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. भाजपाची हीच झुंडशाही आपल्याला संपवायची आहे. हे सरकार कुणाचं आहे? कायद्याने चालणारं की भाजपच्या गुंडांचं? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -