घरमहाराष्ट्रपुणेमुंबईप्रमाणे पुण्यातही पहाटे ५ वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंटला परवानगी

मुंबईप्रमाणे पुण्यातही पहाटे ५ वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंटला परवानगी

Subscribe

२४, २५ व ३१ डिसेंबरला मुंबईतील बार व रेस्ट्राॅरंट पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाते. वाईन शाॅप मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाते. या दिवशी मद्यविक्रीतून राज्य शासनाला अधिक महसुल मिळतो. त्यामुळे बार व रेस्ट्राॅरंट पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाते. त्याच धर्तीवर पुण्यातही ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार व रेस्ट्राॅरंट सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

पुणेः मुंबईप्रमाणे पुण्यातही ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार व रेस्टॉरंट सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातही नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार आहे.

२४, २५ व ३१ डिसेंबरला मुंबईतील बार व रेस्टॉरंट पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाते. वाईन शाॅप मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाते. या दिवशी मद्यविक्रीतून राज्य शासनाला अधिक महसुल मिळतो. त्यामुळे बार व रेस्टॉरंट पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाते. त्याच धर्तीवर पुण्यातही ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार व रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

पुणे पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. बनावट मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन होऊ नये, म्हणून पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. यासाठी २४ पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. दोन अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांचा समावेश प्रत्येक पथकात असणार आहे. या पथकांचे नियोजन दोन उपअधीक्षक करणार आहेत.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या निर्णयाची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात बार व रेस्टॉरंट पहाटे ५ वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्रीची दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनामुळे गेली दोन वर्षे नववर्षाच्या स्वागतावर निर्बंध लादण्यात आले होते. चीनमध्ये आता कोरोनाचा फैलाव होत असला तरी भारतात बाधितांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतावर कोणतेही निर्बध लादण्यात आलेले नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नवीन वर्षाच्या स्वागताला मद्यविक्रीतून राज्य शासनाला मोठ्या प्रमाणावर महसुल मिळतो. त्यामुळेच बार व रेस्टॉरंट पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दरवर्षी राज्य शासन देत असते.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -