घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांवर एंजियोप्लास्टीची वेळ - राधाकृष्ण विखे पाटील

शेतकऱ्यांवर एंजियोप्लास्टीची वेळ – राधाकृष्ण विखे पाटील

Subscribe

राज्यात दुष्काळ असताना देखील सरकारला शेतकऱ्यांची काही पडलेली असून सरकारच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांवर एंजियोप्लास्टीची वेळ आली असल्याची खंत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना हवा तसा उत्पादनात भाव देखील मिळत नाही. कांद्याचा देखील भाव घसरल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून उत्पादनांचे दर पडल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. यामुळे सरकारने शेतकऱ्यांवर एंजियोप्लास्टीची वेळ आणली आहे अशी खंत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लालसगांव येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात व्यक्त केली आहे. नाशिक मधील लासलगांव येथे बाजार समितीमध्ये परमपूज्य भगरीबाबा यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.

केंद्र आणि राज्य सरकारने आधीच शेतकऱ्यांचे आरोग्य बिघडवले आहे. त्यामुळे आपण आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरामुळे तणावातून मुक्तता मिळण्यास मदत होईल अशी आशा देखील यावेळी व्यक्त केली. यावेळी विखे-पाटलांनी सेना-भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेत कांद्याला ४० ते ५० पैसे प्रति किलो दर मिळत आहे. तर कुठल्याच शेतमालाला भाव मिळत नाही. अशा मोठ्या संकटात शेतकरी सापडला आहे. मात्र या सरकारला याचे काही घेणेदेणे नाही. त्यांनी शेतकरी, व्यापारी बरोबर सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेत सत्तेत राहून भाजपावर टीका करतात. मात्र सत्ता सोडण्याचे नाव घेत नाही असा हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांना आठवला राम

निवडणुका जवळ आल्यावर भाजपाबरोबर शिवसेनेलाही राम आठवायला लागला आहे. इतर वेळी राम मंदिर कोणालाही आठवत नाही असे देखील ते त्यावेळी म्हणाले आहेत.

नेम चेंजर सरकार

काँग्रेस सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने आरोग्य योजना सुरू केली होती. या सरकारने फक्त नाव बदलून काँग्रेसच्या काळातल्या योजना पुढे राबवल्या आहेत. हे सरकार गेम चेंजर नसून नेम चेंजर आहे अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी वर्ग तणावात

केंद्र सरकारने नोटबंदी आणि जीएसटी सारखे निर्णय घेतल्याने व्यापारी वर्गाबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवन हे तणावात आले आहे. अजूनही बाजारपेठेतील मरगळ कायम असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या माध्यमातून आज मोफत आरोग्य शिबिर ठेवून नागरिकांना मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याने सभापती होळकर यांचे त्यांनी कौतुक केले आहे.

आमदार होण्याची गुरुकिल्ली सापडली

गेल्या अनेक वर्षांचे आमदार होण्याची इच्छा असलेले नरेंद्र दराडे यांना आमदार होण्याची गुरुकिल्ली सापडली आहे. त्यामुळेच एका घरातील दोन बंधूंना आमदार होण्याचा मान मिळाला आहे. अशी मिश्कील टिप्पणी विकी पाटील यांनी केली आहे.

लालसगांव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तर विखे पाटलांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि लासलगाव डॉक्टर असोसिएशन यांचे विशेष अभिनंदन देखील केले आहे. या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे माजी आमदार शिरीष कोतवाल, गुणवंत होळकर ललित दरेकर लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुजीत गुंजाळ, विकास चांदर, डॉ विजय बागरेचा, डॉ श्रीनिवास दायमा, डॉ. श्रीकांत आवारे. डॉ अनिल बोराडे ,डॉ. शहा, डॉ. शेजवळ आदी उपस्थित होते.


वाचा – हे ‘जलयुक्त’ नाही ‘झोलयुक्त’ शिवार- विखे पाटील

वाचा – सरकार सूडबुद्धीने वागत आहे – विखे पाटील


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -