घरताज्या घडामोडी'भावनेच्या भरात ते बोलले', सत्तारांच्या 'त्या' वक्तव्यावर राधाकृष्ण विखे-पाटलांची प्रतिक्रिया

‘भावनेच्या भरात ते बोलले’, सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राधाकृष्ण विखे-पाटलांची प्रतिक्रिया

Subscribe

'अब्दुल सत्तार माझे जवळचे मित्र असून, भावनिक आहेत. भावनेच्या भरात ते बोलले आहेत', अशा शब्दांत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

‘अब्दुल सत्तार माझे जवळचे मित्र असून, भावनिक आहेत. भावनेच्या भरात ते बोलले आहेत’, अशा शब्दांत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. शिवाय, ‘एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तमरित्या काम करत आहोत’, असेही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. (Radhakrushan Vikhe Patil On Abdul Sattar Reaction Of Hanuman Ambadas Danve)

एका कार्यक्रमादरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबद्दल एक विधान केले होते. “जशी हनुमानाने छाती फाडून भगवान श्रीराम दाखवले, तशी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटीलच दिसतील. विखे-पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत, असं मला वाटतं. कुणाला नाही वाटत आपला मित्र मोठा व्हावा. मात्र, माझ्या मित्राला (विखेंना) अडचण होईल, असं प्रश्न त्यांना विचारू नका. मी सुद्धा अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही”, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते.

- Advertisement -

अब्दुल सत्तारांच्या या वक्तव्यावर राधा कृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “अब्दुल सत्तार माझे जवळचे मित्र असून, भावनिक आहेत. भावनेच्या भरात ते बोलले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तमरित्या काम करत आहोत. मुख्यमंत्री बदलणे किंवा त्याबद्दल दावा करण्याची चर्चा व्यर्थ आहेत”, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

अंबादास दानवेंची सत्तार आणि विखे-पाटलांवर टीका

- Advertisement -

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्या एकमेकांवरील वक्तव्यावर ठाकरे गटाचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी टीका केली. “अब्दुल सत्तारांच्या पोटातलं ओठावर आलं आहे. त्यांच्या पोटात शिजत असेल, ते सत्तारांनी बोलून दाखवलं. कुंकू एकाचं लावायचं, लग्न एकाबरोबर करायचं आणि राहायचं एकाबरोबर अशी परिस्थिती सत्तार यांची झाली आहे. हनुमानाचं नाव घेण्याचा अधिकार सत्तारांना नाही. त्यांच्या छातीत खूपजण निघतील”, असा टोला अंबादास दानवे यांना लगावला.


हेही वाचा – ‘त्या’ प्रकरणी सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -