घर महाराष्ट्र Rain Update : 'या' तारखेपासून राज्यातील परतीच्या पावसाला सुरुवात, हवामान खात्याची माहिती

Rain Update : ‘या’ तारखेपासून राज्यातील परतीच्या पावसाला सुरुवात, हवामान खात्याची माहिती

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची नितांत गरज आहे. परंतु असे असतानाही हवामान खात्याकडून परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलेला पाहायला मिळत आहे. कारण पावसाने जुलै महिन्यात लावलेले हजेरी आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता संकटात सापडलेली आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार तर काही शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचा संकट ओढावलेले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे आता शेतकऱ्यांची खरीपाची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये आता पाणी टंचाईच्या संकटाने डोके वर काढलेले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची नितांत गरज आहे. परंतु असे असतानाही हवामान खात्याकडून परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Rain Update : The return of rain will begin in the month of October)

हेही वाचा – Water shortage : राज्यात पावसाने मारली दडी, ‘या’ जिल्ह्यांत पाणीटंचाईचे संकट

- Advertisement -

राज्यात 5 किंवा 8 ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तर समाधानकारक असा सुद्धा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. फक्त कोकणात आत्तापर्यंत चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतिक्षा आहे. ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे.

मराठवाड्यात राज्यातील सर्वात भीषण परिस्थिती आहे. कारण या भागात सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला असून त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तर पाऊस पडलाच नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

पावसाने गेल्या महिन्याभरापासून दडी मारल्याने आता खरीपाची पिके ही धोक्यात आलेली आहेत. तर काही भागांतील पिके ही जळण्यास सुरुवात झाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. पिके वाचविता यावी यासाठी शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आबे. खरीपाच्या हंगामात पावसाची झालेली अवस्था पाहता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिके लावताना नीट विचार करावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आलेला आहे.

- Advertisment -