घरCORONA UPDATECoronavirus: उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन घाणेरडे राजकारण झाले - राज ठाकरे

Coronavirus: उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन घाणेरडे राजकारण झाले – राज ठाकरे

Subscribe

महाराष्ट्रात आज प्रत्येक नागरिकाला त्याच्या नोकरी, उद्योग, व्यवसाय, मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावत आहे. अशावेळी राजकारण करायला नको. राज्यपालांच्या आडून कोण राजकारण करत असेल तर त्यांनाही याची समज असायला हवी. एकदा या परिस्थितीतून आपण बाहेर पडलो तर मग तुम्ही खुशाल राजकारण करा. पण आज लोकांवर ताण असताना राज्यात घाणेरडे राजकारण झाले, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी आरोप केला.

राज ठाकरे म्हणाले की, “राज्यपालांनी तरी अशा गोष्टी करायला पाहीजे नव्हत्या. राज्यातील प्रत्येक व्यक्ती आज चिंतेत असताना असले राजकारण दूर ठेवायला पाहीजे होते. एकदा कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलो की जे राजकारण करायचे ते करा. मागच्या काही दिवसात फक्त घाण दिसली”

- Advertisement -

महाराष्ट्राच्या ६० व्या वर्धापनादिनानिमित्त बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला दिशा दाखवली होती. मात्र आता राज्याचे होकायंत्र बिघडले असल्याचे ठाकरे म्हणाले. स्वकीयांनीच जर गुडघे टेकले असतील तर समाजाने कुणाकडे पाहायचे. राज्य आजपर्यंत देशाला दिशा देत होता. मात्र तोच महाराष्ट्र आज केंद्रात्या अधीन आला आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -