घरताज्या घडामोडीछगन भुजबळांना तुरुंगवास मोदींविरोधातील टीकेमुळे नाही, राज ठाकरेंनी सांगितलं कारण

छगन भुजबळांना तुरुंगवास मोदींविरोधातील टीकेमुळे नाही, राज ठाकरेंनी सांगितलं कारण

Subscribe

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका बदलली आहे. राज ठाकरेंनी भूमिका बदलली नाही. देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही असे बोलणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती बाळासाहेब ठाकरे होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या उत्तर सभेत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या टीकेमुळे मला जेलमध्ये जावं लागलं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. यावर राज ठाकरेंनी मोदींविरोधातील टीकेमुळे नाही तर तुमच्या जवळच्या लोकांमुळेच जेलमध्ये जावं लागलं असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींच्या भोंग्यांविरोधातील भूमिकेवर टीका करणाऱ्यांना मनसेच्या उत्तर सभेतून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेचा समाचार राज ठाकरेंनी घेतला. यावर राज ठाकरे म्हणाले की, त्यांनी माझ्याविरोधात टीका केली हे खरं आहे. मी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात बोलत होतो. त्यामुळे मला जो त्रास सहन करावा लागला तो करत होता. तो सहन केला परंतु मार्ग बदलला नाही. भुजबळ तुमचा पीए, सीए आणि तुमच्यासोबतचा एक माणूस त्यांनी केलेल्या केसेसमुळे तुम्हाला आतमध्ये जावे लागले. मोदींविरोधात टीका केल्यामुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं नाही. दोन अडीच वर्ष जेलमध्ये गेल्यानंतर पहिला शपथविधी यांचा होतो. सगळे जण सांगतात संपलेला पक्ष आहे याच्यावर काय बोलणार तरी बोलत आहेत. रकानेच्या रकाने बोलत आहेत लिहून काढत आहेत.

- Advertisement -

शरद पवारांनी भूमिका बदलली

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका बदलली आहे. राज ठाकरेंनी भूमिका बदलली नाही. देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही असे बोलणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती बाळासाहेब ठाकरे होते. यानंतर त्यांचा धागा पकडत शरद पवार पक्षातून बाहेर पडले. परंतु निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी भूमिका बदलली आणि कृषीमंत्री झाले असे राज ठाकरे म्हणाले.

अजित पवारांचा राज ठाकरेंनी घेतला समाचार

यांना भोंगे आता दिसले का? यापूर्वी तुम्ही झोपा काढत होता का? असा सवाल अजित पवारांनी केला होता. यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मशिदीच्या भोंग्यांवरुन मी यापूर्वीसुद्धा भूमिका मांडली आहे. परंतु सकाळच्या शपथविधीनंतर अजित पवारांनी आवाज काढला. त्यांना पुढचे तीन चार महिने ऐकू येत नव्हते परंतु लॉकडाऊनंतर त्यांचे कान साफ झाले आहेत. गुढी पाडव्यात त्यांना भोंगा एकू आला.

- Advertisement -

हेही वाचा : माझ्या ताफ्याला अडवणार हे कळलं, पण पवारांच्या घरावरील हल्ल्याचं समजलं नाही : राज ठाकरे

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -