घरमहाराष्ट्रराज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात

Subscribe

अजित पवारांचा खोचक टोला

शिवाजी पार्क येथील महाराष्ट्र नवनमिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढल्याचा गंभीर आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे हे सरड्यासारखे रंग बदलतात. त्यांना नकला आणि टीका करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही, अशा शब्दांत टोला लगावला.

अजित पवार म्हणाले, शरद पवार यांनी राजकारण करत असताना सर्व धर्म समभाव सांभाळला. सगळ्या जातीधर्मातील लोकांना पवारांनी नेतृत्व करण्याची संधी दिली आहे आणि हा पष्ठ्या म्हणतो जातीपातीचे राजकारण केले, काय बोलावे. शरद पवारांचे पहिल्यापासून ते आतापर्यंतचे निर्णय काढून बघा, त्यात कोणीही दाखवावे, त्यांनी जातीपातीचे राजकारण केले. पवारांभोवती राजकारण फिरत असल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येते, असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

एकेकाळी निवडून आलेले मनसेचे 14 आमदार तसेच पक्षातील इतर नेते त्यांना का सोडून गेले, याबद्दल राज ठाकरे यांनी एकदा परीक्षण करावे. नुसती भाषणं करून जनतेचे प्रश्न किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही.

अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात घेतलेल्या भूमिकेचीही आठवण करून दिली. राज ठाकरे सतत पलटी मारतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी आताच्या केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर विधानसभेच्या काळात सुद्धा त्यांनी काय केले हे आपण पाहिले आणि आता शनिवारच्या सभेत काय केले तेही पाहिले. त्यामुळे राज ठाकरे यांचे सरड्यासारखे रंग बदलण्याचे काम चालले अहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

- Advertisement -

मनसेचे भोंगे उतरवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाषण करताना मशिदीवरील भोंगे न उतरल्यास मशिदीसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लवण्याचा इशारा दिला होता. यानंतर रविवारी सकाळी मनसेच्या चांदिवली आणि घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील कार्यालयावर भोंगे लावल्याचे पोलिसांना दिसले. चिरागनगर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना समज देवूनही भोंगे न उतरवल्यामुळे अखेर हे भोंगे उतरवले तसेच भोंगे लावल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.

स्क्रिप्टही भाजपचीच – संजय राऊत
काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा वाजत होता. स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या, घोषणाही भाजपच्याच स्पॉन्सर्ड होत्या. लोकांना वाटलं कालची सभा भाजपची आहे. मदरशात धाडी हे टाळीचं वाक्य आहे. असं वाक्य अनेकदा ऐकलं आहे. टाळ्या आणि घोषणाही त्यांच्या होत्या. त्यावर न बोललेलं बरं, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -