घरमहाराष्ट्रकर्जतमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का, तीन ग्रामपंचायत निवडणुकीत राम शिंदे गटाचा विजय

कर्जतमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का, तीन ग्रामपंचायत निवडणुकीत राम शिंदे गटाचा विजय

Subscribe

राज्यात सत्तातर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाला समोर येऊ लागले आहे. या निवडणुकीत आमदार रोहित पवार गटाला धक्का बसला आहे.

राज्यात सत्तातर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाला समोर येऊ लागले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत आमदार रोहित पवार गटाला धक्का बसला आहे.

राम शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे. कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत राम शिंदे यांचे पॅनल विजयी झाले आहे. कोरेगाव येथे 13 पैकी 7, बजरंगवाडी येथे 7 पैकी 5, कुळधरण येथे 13 पैकी 7 जागांवर राम शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांन धक्का बसला आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व –

अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने वर्चस्व राखले आहे. याठिकाणी 3 पैकी 2 ग्रापंचायती शिंदे गटाकडे आल्या आहेत. नानेगाव आणि जंजाळ ग्रामपंचायतीत गटाने विजय मिळवला आहे. सातारा येथे शिंदे गटाने पहिली ग्रामपंचायत जिंकली आहे. शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात उत्तर तांबवे येथे देसाई पॅनेलला विजय मिळाला आहे. पैठण तालुक्यात ७ पैकी ६ ग्रामपंचायतीत शिंदे गटाने विजय मिळवला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या मतदार संघात. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे गटाला सोलापूर जिल्ह्यात यश –

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाने सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर ग्रामपंचायत मध्ये विजय मिळवला आहे.या निकालामुळे भाजपाचे नेते सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. चिंचपूर ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -