घरमहाराष्ट्रपप्पूंनी आता पप्पा बनावं - रामदास आठवले

पप्पूंनी आता पप्पा बनावं – रामदास आठवले

Subscribe

राहुल गांधी आता एक परिपक्व राजकीय नेता झाले आहेत, अशी भावना लोकांच्या मनामध्ये येताना दिसत आहे. परंतु, राजकीय नेत्यांच्या नजरेत राहुल गांधी अजूनही पप्पू असल्याचे भासत आहे. केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्यावरुन तेच स्पष्ट होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना भर सभेत पप्पू म्हणाले होते. तेव्हापासून राहुल गांधी यांना पप्पू म्हणत हिणवायचं आणि त्यांची टिंगलटवाळी करायची, हे भाजपच्या नेत्यांसाठी नित्यनेमाचेच झाले आहे. या टिंगलटवाळीकडे लक्ष न देता राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणूकीत बऱ्यापैकी यश प्राप्त केले होते. नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचा फज्जा उडवत काँग्रेसने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता काबीज केली. या तीन राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर जनता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना दिसत आहे. राहुल गांधी आता एक परिपक्व राजकीय नेता झाले आहेत, अशी भावना लोकांच्या मनामध्ये येताना दिसत आहे. परंतु, राजकीय नेत्यांच्या नजरेत राहुल गांधी अजूनही पप्पू असल्याचे भासत आहे. याविषयी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच आपले मत दिले आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा – ‘काँग्रेसचा पप्पू आता परमपूज्य झालाय’ – राज ठाकरे

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?

काँग्रेसला तीन राज्यांमध्ये मिळालेल्या यशावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, राहुल गांधी यांनी तीन राज्यांमध्ये चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे ते आता पप्पू राहिलेले नाहीत, आता ते पप्पा झाले आहेत, असे आठवले म्हणाले. यापुढे ते म्हणाले की, राहुल गांधी यांना आतापर्यंत पप्पू म्हटलं जायचं. परंतु, आता त्यांनी पप्पू नाहीतर पप्पा बनलं पाहिजे. यासाठी त्यांनी लग्न केलं पाहिजे, हा माझा त्यांना सल्ला आहे. राहुल गांधी यांना तीन राज्यांमध्ये यश मिळाले आहे, त्यामुळे त्यांनी लवकर लग्न करावे आणि पप्पा बनावं, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.


 हेही वाचा – कोण पप्पू आणि कोण फेकू – शत्रुघ्न सिन्हा

- Advertisement -

तर शिवसेनेलाही नुकसान – आठवले

यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेलाही सल्ला दिला आहे. शिवसेनेनं भाजपसोबत युती तोडू नये, कारण युती कायम न राहिल्यास त्याचा फटका शिनसेनेलाही बसेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याचा विचार करु नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. त्याचबरोबर पाच राज्यांमध्ये झालेला पराभव हा एकटे नरेंद्र मोदी यांचा पराभव नसून संपूर्ण भाजपचा पराभव आहे, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.


हेही वाचा – भाजपसाठी मी पप्पू असेन; पण माझ्या मनात द्वेष नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -