घरदेश-विदेशव्हॉट्सअॅपने आणले व्हिडीओचे भन्नाट फिचर

व्हॉट्सअॅपने आणले व्हिडीओचे भन्नाट फिचर

Subscribe

व्हॉट्सअॅपवर आता लवकरच एक व्हिडीओचे भन्नाट फिचर येणार आहे. व्हॉट्सअॅप अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या व्हिडीओ लिंक पाहण्यासाठी बाहेर यावे लागणार नाही. आता त्या व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर चालू असतानाच पाहता येणार आहे. तसेच त्या दरम्यान व्हॉट्सअॅपवरील संदेश देखील पाहता येणार आहे.

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंतीचे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हे व्हॉट्सअॅप लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवे अपडेट्स घेऊन येतं. काही दिवसांपुरतीचे व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणल आहे त्या फीचरमध्ये कुठल्याही व्यक्तीला अॅड करण्यापूर्वी त्या व्यक्तीची परवानगी घेणे आता बंधनकारक असणार आहे. हे फीचर नुकतेच युजर्सच्या भेटीस आणले असून आता पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपने व्हिडीओचे भन्नाट फिचर युजर्सच्या भेटीस आणले आहे.

काय आहे हे नवीन फीचर्स

व्हॉट्सअॅपवर आपल्याला विविध व्हिडीओच्या लिंक येत असतात. मात्र त्या लिंक पाहण्यासाठी आपल्याला दुसऱ्या ब्राऊजरवर जावं लागत. मात्र आता व्हॉट्सअॅपने आता यावर एक तोडगा काढला आहे. आता नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ पाहता येणार आहे. या नवीन व्हॉट्सअॅप अपडेटनुसार व्हिडीओ लिंक पाहण्यासाठी बाहेर यावे लागणार नाही. आपण ती व्हिडीओ त्या व्हॉट्सअॅपवर चालू असताना पाहू शकतो तसेच त्याचदरम्यान व्हॉट्सअॅपवरील एसएमएस देखील पाहता येऊ शकतात. गेल्या काही दिवसांपूर्वी याची चाचणी करण्यात आली होती. ती आता सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. याला Picture – in Picture (PIP) (पिक्चर इन पिक्चर) मोड असं म्हटलं जातं आहे.

- Advertisement -

अँड्रॉइड युजर्सकरता हे अॅप उपलब्ध

सध्या हे फिचर फक्त अँड्रॉइड युजर्ससाठीच उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप अँड्रॉइडच्या नव्या अपडेटमध्ये (Version 2.18.280) ही सुविधा वापरता येणार आहे. तसेच हे नवे फीचर लवकरच आयफोन आणि टॅबसाठी लवकरच उपलबध्द होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या हे फीचर बेटा मोडसाठी उपलब्ध आहे. युट्युब, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या बाहेरच्या साइट्सवरील लिंक्स असलेले व्हिडीओ व्हॉट्सअॅपमध्ये पाहता येणार आहे. तुम्हाला व्हिडीओ थंबनेल प्रिव्हयू दिसणार मेसेज आला कि त्यावर तुम्ही टॅप करुन तो व्हिडीओ लगेच पाहू देखील शकता. तो व्हिडीओ तुम्हाला मोठ्या आणि छोट्या विंडोमध्ये देखील दिसणार आहे.

व्हॉट्सअॅपवर हे देखील फीचर्स येणार

व्हॉट्सअॅपवर आता लवकरच इतरही फीचर्स लवकरच येणार आहेत. या फीचर्समध्ये डार्क मोड हे फीचर्स येणार आहे. या फीचर्समुळे य़ुजर्सच्या डोळ्याला त्रास देखील होणार नाही. त्यासोबतच मल्टी शेअर, ग्रुप कॉल शॉर्टकट हे देखील फीचर्स लवकरच येणार आहेत.

- Advertisement -

वाचा – नकोशा व्हॉट्सअॅप ग्रुपमधून होईल सुटका

वाचा – व्हॉट्सअॅप लवकरच सुरु करणार पेमेंट बँक?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -