घरमहाराष्ट्ररामदास आठवलेंनी सलग तीसऱ्या वर्षी 'भीम'ला घेतले दत्तक

रामदास आठवलेंनी सलग तीसऱ्या वर्षी ‘भीम’ला घेतले दत्तक

Subscribe

एकेकाळचे पँथर असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्या वर्षी भीम नावाचा बिबट्या दत्तक घेतला आहे. आज (२२ जून) बोरीवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दत्तक घेण्याची प्रक्रिया पार पडली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे दरवर्षी वन्य प्राणी दत्तक योजना राबविली जाते. तीन वर्षांपूर्वी रामदास आठवले यांनी दत्तक योजनेतून बिबट्या दत्तक घेतला होता. त्याचे नाव त्यांने भीम असे ठेवले होते. त्यानंतर सलग तीसऱ्या वर्षी त्यांनी भीमला दत्तक घेतले आहे. यावेळी आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले, मुलगा जित आठवले, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -