घरमहाराष्ट्रचिमुकलीवर बलात्कार, नागरिकांनी रोखला हायवे

चिमुकलीवर बलात्कार, नागरिकांनी रोखला हायवे

Subscribe

सोनखेड येथे एका लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला पोलिसांनी अटक केली . सुग्रीव मोरे (वय 28) असे या आरोपीचे नाव आहे. या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग शुक्रवारी सकाळपासून रोखून धरला. त्यामुळे सोनखेड गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सोनखेड गावातील चिमुकली मंगळवारी घराबाहेर खेळत होती. खेळता-खेळता ती बेपत्ता झाली. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी सोनखेड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळली नाही. त्यानंतर बुधवारी (26 फेब्रुवारी) पहाटे ही मुलगी दगडगावाकडे जाणार्‍या रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत रडत असताना एका व्यक्तीला दिसली. त्या व्यक्तीने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मुलीला ताब्यात घेतले. मुलीची अवस्था गंभीर होती. त्यामुळे पोलिसांनी तिला रुग्णलयात दाखल केले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी पोस्को आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सोनखेड गाठत याबाबतची इत्यंभूत माहिती घेतली. पोलिसांनी आपले खबरी या कामाला लावले. या दरम्यान, पोलिसांनी सुग्रीव मोरे या 28 वर्षीय आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपी सुग्रीवने आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी गावातील लोकांना विश्वासात घेऊन सुग्रीव मोरे हाच आरोपी असल्याची खात्री करुन घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -