Friday, July 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार : भुजबळ

आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार : भुजबळ

फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

माझ्यासाठी राजकारणापेक्षा ओबीसी आरक्षणाचा मुददा महत्वाचा आहे. राजकारण हा वेगळा विषय आहे परंतू ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असून ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ यांनी मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सकाळी भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही भेट घेतली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यास संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.यानंतर भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन होताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षणावर तोडगा महत्वाचा असून याकरीता सामूहिक नेतृत्व करू असेही ते म्हणाले. इम्पेरिकल डेटा संदर्भात दोन तीन दिवसांत सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -