घरताज्या घडामोडीCoronaVirus: राज्यात एक तृतीयांश मुस्लिमांचा मृत्यू: उर्दू भाषेत जनजागृती करणार सुरू

CoronaVirus: राज्यात एक तृतीयांश मुस्लिमांचा मृत्यू: उर्दू भाषेत जनजागृती करणार सुरू

Subscribe

राज्यातील मुस्लिम समुदायाच्या लोकसंख्यापेक्षा तीन पटीने जास्त कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आहे.

देशातील कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात ५० हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात ३ मेपर्यंत ५४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २३९ जण म्हणजे ४४ टक्के लोक हे मुस्लिम समुदायाचे आहे. राज्यात पाहायला गेले तर १२ टक्क्यांपेक्षा कमी मुस्लिम समुदायाची लोकसंख्या आहे. परंतु कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे तीन पटीने जास्त आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही हॉटस्पॉटध्ये उर्दू भाषेत जनजागृती करण्यासाठी आणि स्थानिक धर्मगुरुची मदत घेऊन योजना तयार करायला सांगितल्या आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, राज्यात १७ मार्च ते १५ मार्चमध्ये १८७ पैकी ८९ मुस्लिम समुदायातील लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १७ मार्चला राज्यात कोरोनामुळे पहिला बळी गेला होती. तसेच १ एप्रिल ते ४ मे दरम्यान ३६१ मृतांपैकी १५० लोक मुस्लिम समुदायतील होते. राज्यातले अधिकारी आणि तज्ज्ञांनी यामागची अनेक कारणे सांगितली आहेत. जेसे की, आखाती देशामधून देणाऱ्या प्रवास बंदी उशीर केली. तसेच २० मार्चपर्यंत मशीद मधील नमाज पठण सुरू होते, अशी अनेक कारणे दिली आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत राज्यात कोरोनाचे १६ हजार ७५८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६५१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण हे मुंबई शहरात आढळले असून मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्यावर आहे.


हेही वाचा – LockDown: दारूची दुकाने उघडल्यानंतर ‘या’ राज्यात पान मसाल्यावरील बंदी हटवली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -