घरमहाराष्ट्रनितीन गडकरींच्या उपस्थितीत मुळा-मुठा नदीच्या पुनरूज्जीवनासंदर्भात आढावा बैठक 

नितीन गडकरींच्या उपस्थितीत मुळा-मुठा नदीच्या पुनरूज्जीवनासंदर्भात आढावा बैठक 

Subscribe

सिंचन प्रकल्पांसाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या पुनरूज्जीवनासंदर्भात दिल्लीत बुधवारी आढावा बैठक घेतली. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नागपूरमधील नाग नदीचे पुनरूज्जीवन, तसेच गोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्प यांच्याबाबतही चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गजेंद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांबाबत एक बैठक आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि इतरही नेते उपस्थित होते.

- Advertisement -

पुण्यातील मुळा-मुळा नदीचे पुनरूज्जीवन, नागपुरातील नागनदीचे पुनरुज्जीवन, गोसिखुर्द प्रकल्पाच्या कामाला गती, सुलवाडे प्रकल्प तसेच प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेतील २६ प्रकल्प, बळीराजा जलसंजीवनी योजनेतील विशेष पॅकेजच्या ९१ प्रकल्पांचा आढावा यात घेण्यात आला. या सर्व प्रकल्पांमधील अडचणी सोडवून प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने अतिशय चांगली आणि रचनात्मक चर्चा यावेळी झाली, असेही फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा – लग्नसमारंभाचे हॉल, सिनेमागृहे, स्विमिंग पूल क्षमतेत ५० टक्क्यांपर्यंत वाढ

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -