घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबागलाण तालुक्यातील ११९२ कोंबडयांची विल्हेवाट

बागलाण तालुक्यातील ११९२ कोंबडयांची विल्हेवाट

Subscribe

बागलाण तालुक्यातील वाठोडे येथे मृत झालेल्या कोंबडयांमध्ये बर्ड फ्ल्यूूची लक्षणे आढळून आल्याने जिल्हयात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हयाच्या इतर भागात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढू नये याकरीता प्रशासन सर्तक झाले आहे. याची दखल घेत बुधवारपासून गावात पक्ष्यांचे कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान सुमारे ११९२ कोंबडयांची विल्हेवाट लावण्यात आली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज या गावात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

वाठोडे ग्रामपंचायत हदिदत शेतकरी सुरेश महाले यांनी घरात कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडे सुमारे ३०० कोंबडया आहेत. कोंबडयांचा अचानक मृत्यु होण्याच्या प्रकाराने त्यांनी तातडीने पशुवैद्यकिय अधिकार्‍यांना माहीती दिल्यानंतर या कोंबडयांचा अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर त्यांच्या बर्ड फ्ल्यूची लक्षणे आढळून आली आहेत. जिल्हयात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याची माहीती प्रशासनाला मिळाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने सर्तकतेचा इशारा देत प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना लागू केल्या. बर्ल्ड फल्यू नियंत्रण टिम गावात दाखल झाली असून परिसरातील सर्व कुक्कुट पक्षी पकडून एका विशिष्ट प्रक्रियेव्दारे कलिंग करून खडडयात पुरण्याचे काम सुरू झाले आहे. बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने एसओपी तयार केला आहे. त्यानूसार गावात मृत कोंबडया पुरण्यासाठी खडडा खोदण्यात आला असून या खडडयात कोंबडया पुरण्याचे काम सुरू झाले आहे. प्रशासनाला कलिंग ऑपरेशनसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पंचायत समिती सदस्य सोमनाथ सुर्यवंशी यांनी आपल्या खाजगी जागेत जागा उपलब्ध करून दिली. ग्रामपंचायत प्रशासनाने कलिंग प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर संपूर्ण गाव निर्जंतुकिकरण करण्यात आल्याची माहीती सरपंच लक्ष्मण महाले यांनी दिली. दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी आदिवासी जनतेच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत प्रशासनाला सर्व नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -