घरमहाराष्ट्रसध्याचं पक्षीय राजकारण जनतेच्या पचनी पडत नाही; अंधेरी पोटनिवडणुकीवरून रोहित पवारांचा खोचक...

सध्याचं पक्षीय राजकारण जनतेच्या पचनी पडत नाही; अंधेरी पोटनिवडणुकीवरून रोहित पवारांचा खोचक टोला

Subscribe

सुरुवातीला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून रंगलं तर ठाकरे गटाकडून मुरजी पाटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला होता. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत चांगलाच टोला लगावला आहे.

राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. अशातच शिवसेनेचे(shivsena0 अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके(ramesh latake) यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. या निवडणुकीत भाजप(bjp) कडून मुरजी पटेल (muraji patel) यांना उमेदवारी दडण्यात आली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके(rutuja latake) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून रंगलं तर ठाकरे गटाकडून मुरजी पाटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला होता.

अशातच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत (andheri by-election) मोठी घडामोड घडली आहे. भाजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही या निवडणुकीतून माघार घेत आहोत अशी घोषणा केली. दरम्यान भाजपच्या या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे (ncp) आमदार रोहित पवार ( MLA rohit pawar) यांनी भाजपच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत चांगलाच टोला लगावला आहे.

- Advertisement -
rutuja latke  and muraji patel
rutuja latke and muraji patel

काय म्हणाले रोहित पवार

अंधेरी पोटनिवडणूक (andheri by-election) बिनविरोध होईल, असं चित्र दिसत आहे. पण त्यापूर्वी जे घडलं ते निंदनीय होतं. त्यांनी आधीच ही निवडणूक बिनविरोध होईल असं जाहीर केलं असतं तर महाराष्ट्राची परंपरा जपली गेली असती. असं राष्ट्रवादीचे (ncp) आमदार रोहित पवार (MLA rohit pawar) म्हणाले.

- Advertisement -

ग्रामपंचयात निकालावर प्रतिक्रिया

दरम्यान रोहित पवार यांनी आतापर्यंतच्या आलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालावरही भाष्य केलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळत आहे. हे सध्याच्या चित्रावरून दिसतंय. संध्याकाळपर्यंत हेच चित्र कायम राहील. जनतेच्या मनात काय आहे, त्यांना पक्षात सुरु असलेल्या घडामोडी पचनी पडल्या नाहीत, हे या निकालातून स्पष्ट दिसत आहे. असंही रोहित पवार म्हणाले.


हे ही वाचा – बिनविरोध झाली नसती तरी जिंकून आले असते; ऋतुजा लटकेंनी सगळ्यांचे मानले आभार

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -