घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररोलेटकिंग कैलास शहा पोलिसांच्या ताब्यात

रोलेटकिंग कैलास शहा पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

रोलेटप्रकरणात फरार असलेला मुख्य सूत्रधार कैलास शहा यास पोलिसांनी सीबीएस परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले आहे. तो पोलिसांच्या ताब्यात आल्याने आता जिल्ह्यातील रोलेटची पाळेमुळे उखडून टाकली जाणार आहेत.
जिल्ह्यातून रोलेटची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. त्यामुळे रोलेटचालकांचे धाबे दणाणले आहेत.

बेकायदा बिंगो रोलेट खेळायला प्रवृत्त करत लाखो रुपये हरल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नामदेव रामभाऊ चव्हाण यांनी गळफास लावून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रमेश चौरसिया, आंचल चौरसिया, कैलास प्रसाद शहा, शांताराम पगार व सुरेश पगार या रोलेटचालकांनी चव्हाण यांना आमिष दाखवत जुगार खेळण्यास प्रवृत्त केले होते. त्यास ते वैतागले होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. ग्रामीण पोलिसांनी जोगेंद्र शहा यास अटक केली आहे. रोलेटचा मुख्य पासवर्ड रमेश चौरसियाकडे असल्याचे समजते. त्याच्याकडे नाशिक जिल्हा व उत्तर महाराष्ट्राचे बुकी रोलेटचे ऑनलाइन व्यवहार करत बोलले जात आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात जोगेंद्र शहा, रमेश चौरसिया, आंचल चौरसिया, कैलास शहा, शांताराम पगार व सुरेश पगार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोलेटप्रकरणी कैलास शहा, रमेश चौरसिया व आंचल चौरसियाविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी जानेवारी २०२१ मध्ये लूकआऊट नोटीस बजावली आहे. तेंव्हापासून पोलीस कैलास शहा, रमेश चौरसिया, आंचल चौरसिया शोध घेत आहे. कैलास शहा सीबीएस परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -