Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुलायमसिंहांचे समर्थन घेताना भाजपच्या ह्रदयातील राम कुठे गेला? सचिन सावंतांचा आशिष शेलारांवर...

मुलायमसिंहांचे समर्थन घेताना भाजपच्या ह्रदयातील राम कुठे गेला? सचिन सावंतांचा आशिष शेलारांवर पलटवार

Subscribe

बिहारच्या औरंगाबाद जिल्हा नामांतराचे काय? असा सवाल करत दुटप्पी भाजपाने यंत्रणा वापरल्या वा आदळआपट केली तरी मविआ अभेद्य आहे" असे सचिन सावंत म्हणाले.

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमने काँग्रेसला पाठिंबा दिला. राज्यसभा निवडणूक मतदानाच्या दिवशीच एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देत असून काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे जाहीर केले. राज्यसभेत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. परंतु एमआयएमच्या पाठिंबा दिल्यामुळे भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केले. एमआयएमचे मत घेताना ह्रदयातील राम कुठे काढून ठेवला? असा सवाल शेलारांनी केला होता. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत यांनी पलटवार करताना मुलायमसिंह यांच्या समर्थनावरुन निशाणा साधला आहे. (Sachin Sawant’s retaliation against Ashish Shelar)

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप आमदार आशिष शेलारांच्या टीकेवर पलटवार केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमने पाठिंबा दिल्यामुळे शेलारांनी महाविकास आघाडीवर टीका करताना ह्रदयातील राम काढला होता. यावर सचिन सावंतांनी राष्ट्रपाती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला मुलायम सिंह यांनी दिलेल्या पाठिंब्यांची आठवण करुन दिली आहे. तसेच त्यावेळी भाजपच्या ह्रदयातील राम कुठे गेला? असा सवालसुद्धा शेलारांना केला आहे. आशिष शेलारांनी आपल्या स्मृतीभ्रंशावर उपचार केला पाहिजे असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे. “शेलारजी स्मृतीभ्रंशावर उपचार करा. २०१७च्या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाने MIM च्या समर्थ़नाची मागणी कशी केली? मुलायमसिंहांचे समर्थन घेतले तेव्हा हृदयातील राम कुठे गेला? बिहारच्या औरंगाबाद जिल्हा नामांतराचे काय? दुटप्पी भाजपाने यंत्रणा वापरल्या वा आदळआपट केली तरी मविआ अभेद्य आहे” असे सचिन सावंत यांनी सांगितले आहे.

आशिष शेलार काय म्हणाले होते?

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीमध्ये सपाची मते ही चालवून घेतली तेव्हा ह्रदयातला राम कुठे काढून ठेवला? आता सांगा कुणाची बी टिम? महाराष्ट्रात संजय पवार हारतो आणि इम्रान प्रतापगढी जिंकतो हा प्रताप आता महाराष्ट्र बघतो आहे. उघड मतदानात जे चित्र समोर आले त्याने एवढे बावचळलेत मग विधानपरिषद निवडणूक गुप्त मतदानाने, तेव्हा काय करणार? असा थेट सवाल आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.


हेही वाचा : उघड मतदानाने बावचळले तर विधान परिषदेत गुप्त मतदानात काय करणार?, आशिष शेलारांचा टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -