घरमहाराष्ट्रअंधुक दिवे आणि कुर्ता घातलेले सचिन वाझे, NIA ने केलं घटनेचं नाट्यरुपांतर

अंधुक दिवे आणि कुर्ता घातलेले सचिन वाझे, NIA ने केलं घटनेचं नाट्यरुपांतर

Subscribe

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांची NIA कसून चौकशी करत आहे. चौकशीचाच एक भाग म्हणून घटनास्थळावर सचिन वाझे यांना आणून सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालायला लावत घटनेचे नाट्यरुपांतर केलं. NIA आणि फॉरेन्सिक टीमने अँटिलिया परिसर ब्लॉक करुन सीन रिक्रिएट केला. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्यानंतर सीसीटिव्हीमध्ये जे फुटेज मिळाले त्याप्रमाणे हे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. जवळपास अर्धा तास हे रुपांतर चालू होते.

असं केलं नाट्यरुपांतर

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्यानंतर सीसीटिव्हीमध्ये जे फुटेज मिळाले त्यामध्ये पीपीई किट सदृष्य झब्बा घालून एक व्यक्ती मागील बाजून उतरुन निघून गेला असं दिसतंय. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझे असल्याचा एनआयएला संशय आहे. त्यामुळे या व्यक्तीची चाल ही वाझें सारखी आहे का? हे पाहण्यासाठी सचिन वाझे यांना घटनास्थळी आणून फुटेजमधील व्यक्तीप्रमाणे चालण्यास सांगण्यात आलं होतं.

- Advertisement -

सचिन वाझेंना चालण्यास सांगण्यापूर्वी सर्व ठिकाणी मार्किंग केलं होतं. तपासासाठी पुणे फॉरेन्सिक टीमला देखील बोलावण्यात आलं होतं. सीसीटीव्हीमध्ये जितका प्रकाश दिसतो, तितके दिवे सुरु करण्यात आले. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती ज्या मार्गावर चालली, तिथे एनआयएने रस्त्यावर काही खुणा केल्या. त्या खूणांच्या दिशेनेच चालायला लावलं. सचिन वाझे यांची नैसर्गिक चाल ओळखण्यासाठी त्यांना अनेकदा चालण्यास सांगितलं. सचिन वाझे यांना सुरुवातीला पँट-शर्टमध्ये विशिष्ठ ठिकाणावरुन चालण्यास सांगण्यात आले. यानंतर त्यांना कुर्ता घालूनही दोनतीन वेळा चालायला लावले. च्या डोक्याला रुमाल बांधलेला पहायला मिळाला.

हे सर्व नाट्यरुपांतर संग्रहित करण्यासाठी पुण्यावरुन खास फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आलं होतं. या पथकाने हे सर्व पुरावे आपल्या सोबत तपासासाठी घेतले आहेत. जवळपास अर्धा तास हे नाट्यरुपांतर सुरु होते.

- Advertisement -

हेही वाचा –  मनसुख हिरेन हत्येचा तपास एनआयएकडे


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -