Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Saki Naka rape : साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!...

Saki Naka rape : साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार! मुख्यमंत्र्यांचे आदेश

गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

Related Story

- Advertisement -

मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार पीडित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गुन्हेगारास कठोर शिक्षा सुनावली जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला मुंबईतील कोर्टाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

साकीनाकी परिसरात पीडित महिलेवर बलात्कार करुन नराधम आरोपीने तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा संतापजनक प्रकार घडला. या घृणास्पद प्रकरणानंतर मुंबई पुन्हा एकदा महिलांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान या पीडित महिलेला गंभीर अवस्थेत घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.


- Advertisement -