घरमहाराष्ट्रडॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री

Subscribe

वैद्यकीय नियमांचे उघडपणे उल्लंघन
काही दिवसांपूर्वी शहरातील एका नामांकित रुग्णालयावर गर्भपात केला जात असल्याने कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्यभर खळबळ माजली होती. आता तर गर्भपाताच्या गोळ्यांची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय संगमनेर शहरातील मेडिकलच्या दुकानांमधून सर्रासपणे विक्री होत आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी विविध प्रयत्न होत असताना, दुसरीकडे तितकीच धोकादायक मानली जाणारी गर्भपाताची औषधे (इमर्जन्सी काँट्रासेप्टिव्ह पिल्स) आणि इंजेक्शनची सर्रास विक्री होत आहे. या गोळ्यांद्वारे घरच्या घरी गर्भपात केले जात आहेत. यामुळे प्रसंगी जीवावर बेतू शकते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. गर्भपात करणाऱ्या या गोळ्यांमुळे अकारण अनेक व्याधी जडू शकतात.
डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसतानाही मेडिकल स्टोअरमधून सहजपणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत आहे. यातील काही गोळ्या ओव्हर द काऊंटर प्रकारात मोडल्या जात असल्याने त्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी असलीच पाहिजे, असे बंधन नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. असुरक्षित संबंधांनंतर ७२ तासांच्या आत गोळ्या घेऊन गर्भधारणा टाळता येते. त्यासाठी शासकीय माला-डी, आय-पिल, अनवॉण्टेड-७२ या गोळ्यांचा वापर केला जातो.
गर्भातील मूल विकलांग असेल वा ते अ‍ॅबनॉर्मल असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करता येतो. नऊ आठवड्यांपर्यंत गोळ्यांद्वारे गर्भपात करता येतो. त्यापुढे मात्र वैक्रडीलसारख्या इंजेक्शनचा वापर करून गर्भपात करावा लागतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या इंजेक्शनचे परिणाम अत्यंत गंभीर असतात. इंजेक्शन घेतल्यानंतर गर्भ जळाल्यासारखा काळा- निळा पडतो. एक प्रकारे ही भ्रूणहत्याच मानली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -