घरताज्या घडामोडीकेवळ चर्चा न करता सारथी उपकेंद्राला जमीन मिळाली, संभाजीराजेंकडून ठाकरे सरकारचे कौतुक

केवळ चर्चा न करता सारथी उपकेंद्राला जमीन मिळाली, संभाजीराजेंकडून ठाकरे सरकारचे कौतुक

Subscribe

सारथीला अद्ययावत संशोधन केंद्र करायचं असेल तर त्यासाठी ५ एकर जमीन हवी

कोल्हापुरात “राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात सारथी संस्थेच्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात शाहू महारांज्या कर्मभूमित केल्यामुळे संभाजीराजेंनी आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आहे. संभाजीराजे यांनी म्हटंल आहे की, हे उपकेंद्र अद्ययावत करण्यासाठी २ एकर जागा दिले परंतु ही अपुरी आहे. यामुळे राज्य सरकारने किमान ५ एकर जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

सारथीच्या उद्घाटन प्रसंगी ४ वर्षांच्या अगोदर मी स्वतः कार्यक्रमाला बोलवले होते. आमची इच्छा होती की सारथीला स्वायत्ता राहायला पाहिजे. परंतु एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून ती स्वायत्ता गेली होती. मग प्रसंग असल्यास संघर्ष प्रसंग असल्यास चर्चा अशा प्रकारे माझी नेहमी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मुक आंदोलन केले या मूक आंदोलनाचा हेतू हा होता की आरक्षणाचा लढा चालुचा राहणार आहे. याला वर्षा सव्वा वर्ष लागेल याची काही कल्पना नाही आहे. पण सामाजाल सक्षम करायचे असेल तर सारथी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं गरजेचे आहे. म्हणुनच ती कंपनी फॉर्मेशन अॅक्टच्या माध्यमातून तयार झाली आहे. परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. दोन दिवसांपुर्वी शनिवारी उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेतली होती. या बैठकीमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.

- Advertisement -

प्रामुख्याने उपकेंद्र शाहू महाराजांच्या भूमित उपकेंद्र निर्माण करण्याचा निर्णय झाला आहे. यावेळी नुसता निर्णय झाला नाही तर उपकेंद्रा लगत असेलीली दोन ते सव्वा दोन एकर जमीन आणि इमारत हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला आहे. मी आज सरकारचं कौतुक आणि आभार मानले आहे. राज्य सरकारला सांगितले आहे की, सारथीला अद्ययावत संशोधन केंद्र करायचं असेल तर त्यासाठी ५ एकर जमीन हवी. मला विश्वास आहे सुरुवात चांगली झाले. मी सरकारचं कौतुक आणि आभार मानले असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -