घरताज्या घडामोडीमराठा आरक्षण : संभाजीराजे गुरुवारी घेणार राष्ट्रपतींची भेट

मराठा आरक्षण : संभाजीराजे गुरुवारी घेणार राष्ट्रपतींची भेट

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी राज्यातील प्रमुख ४ पक्षातील खासदार प्रतिनिधींना सोबत येण्याचे आवाहन केलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची वेळ मागितील होती. राष्ट्रपतींनी खासदार संभाजीराजेंना गुरुवार २ सप्टेंबरची भेटीची वेळ दिली आहे. राज्यातील सर्वपक्षीय एक खासदार प्रतिनिधींसोबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींची भेटीची वेळ मिळाली असून गुरुवारी भेटणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली होती. मराठा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या भावना राष्ट्रपतींसमोर मांडण्यासाठी संभाजीराजेंनी वेळ घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेतली असून मराठा समाजाच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न संभाजीराजे करत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी राज्यातील प्रमुख ४ पक्षातील खासदार प्रतिनिधींना सोबत येण्याचे आवाहन केलं आहे. यामध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसकडून प्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटे तर भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहे. हे शिष्टमंडळ खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

- Advertisement -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची गुरुवारी दुपारी ४.३० वाजता संभाजीराजे छत्रपती आणि सर्वपक्षीय लोकप्रितिनीध भेट घेणार आहेत. केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करुन राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु केंद्र सरकारने आरक्षणातील ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी अशी मागणी राज्य सरकारची आहे. १२७ व्या घटनादुरुस्तीचमुळे राज्यांना अधिकार प्राप्त झाले आहेत. ओबीसी आरक्षणातील इम्पेरिकल डेटाच्याबाबतीत संभाजीराजे राष्ट्रपतींसोबत काय चर्चा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजेंनी राज्यभरात मूक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारने मागण्या पुर्ण करण्याबाबत ग्वाही दिल्यामुळे आंदोलनं स्थगित करण्यात आली आहेत. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सोबत येऊन प्रयत्न करावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -