घरमहाराष्ट्रआर्यन खान प्रकरणातून हटवण्याची मागणी मीच केली होती -  समीर वानखेडे

आर्यन खान प्रकरणातून हटवण्याची मागणी मीच केली होती –  समीर वानखेडे

Subscribe

क्रूझ ड्रग्ज (Cruise Drugs Case) प्रकरणामध्ये झालेल्या विविध आरोपांनंतर एनसीबीचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. यावर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आर्यन खान आणि इतर पाच प्रकरणांचा तपास आपल्याकडून काढून घेण्यात आला नाही, तो आता केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे असं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. तसंच मीच आर्यन खान प्रकरणातून हटवण्याची मागणी केली होती, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

समीर वानखेडे यांच्या बदली झाल्याची देखील चर्चा सुरू होती. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांनी स्वत: आपली बदली झाली नसल्याचे सांगितले आहे. ‘माझी बदली झालेली नाहीये, मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत,’ असं वानखेडे यांनी सांगितलं.

- Advertisement -

समीर वानखेडे पुढे बोलताना म्हणाले की, माझ्याकडील फक्त केसेस दिल्लीतील टिमकडे देण्यात आल्या आहेत. मी माझ्या याचिकेत म्हटलं होतं की या दोन केसेसचा कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास करावा. आर्यन खान, समीर खान यांच्या केसचा आयपीएस संजय सिंह यांच्या नेतृत्वात तपास होणार. तसंच त्यांनी ‘मी मुंबईतच झोनल डायरेक्टर म्हणून कायम आहे, असंही स्पष्ट केलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -